AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini: वृंदावनमध्ये हेमा मालिनी यांनी गायलं शिक्षाष्टकम भजन; भक्तीत लीन झाले भक्त

हेमा मालिनी या शनिवारी वृंदावनला गेल्या होत्या. इथल्या राधारमण मंदिरात त्या कृष्ण भक्तीत लीन झाल्या. मंदिरात उपस्थित असलेल्या हजारो भक्तांसमोर त्यांनी शिक्षाष्टकम भजन गायलं.

Hema Malini: वृंदावनमध्ये हेमा मालिनी यांनी गायलं शिक्षाष्टकम भजन; भक्तीत लीन झाले भक्त
हेमा मालिनीImage Credit source: ANI
| Updated on: Jan 15, 2023 | 1:49 PM
Share

वृंदावन: मथुरेच्या खासदार आणि बॉलिवूडची ड्रिम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी या सध्या राजकीय प्रवासावर लक्ष केंद्रीत करत आहेत. हेमा मालिनी यांना कामातून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा त्या भगवान भक्तीत लीन पहायला मिळतात. भाजप खासदार हेमा मालिनी नुकत्याच वृंदावनला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी राधारमण मंदिरात भजनसुद्धा गायलं. सोशल मीडियावर या भजन गायनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत त्या भजन गाताना दिसत आहेत.

हेमा मालिनी या शनिवारी वृंदावनला गेल्या होत्या. इथल्या राधारमण मंदिरात त्या कृष्ण भक्तीत लीन झाल्या. मंदिरात उपस्थित असलेल्या हजारो भक्तांसमोर त्यांनी शिक्षाष्टकम भजन गायलं. त्यांनी गायलेलं भजन ऐकताना भक्तसुद्धा कृष्णभक्तीत लीन झाले.

हेमा मालिनी यांनी जवळपास 30 मिनिटांत चार भजनं गायली. हेमा मालिनी यांची कृष्णभक्ती याआधीही पहायला मिळाली होती. सुरुवातीला त्यांनी ‘न राधा न मीरा हूँ, मै तो कृष्ण दिवानी हूँ’ हे भजन गायलं. तेव्हा त्यांच्यासोबत मंदिरात उपस्थित असलेले भक्तसुद्धा भजनात दंग झाले. त्यानंतर त्या हरे कृष्णा हरे कृष्णा हे भजन गुणगुणल्या.

पहा व्हिडीओ-

हेमा मालिनी यांना अशा प्रकारे मंदिरात भजन गाताना पहिल्यांदाच पाहिलं गेलं. त्यांच्या या भजनादरम्यान टाळ्यांचा कडकडाटसुद्धा झाला आणि ‘राधा कृष्ण’चा जयजयकारही ऐकायला मिळाला. हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भजन गाण्याआधी हेमा मालिनी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

Follow Us
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय राऊतांचं विधान
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...