AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Matka King : ‘मटका किंग’मध्ये नागराज मंजुळेंकडून मोठी चूक; नेटकऱ्याने बरोबर हेरली, पहा व्हिडीओ

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' या वेब सीरिजमधील एक चूक नेटकऱ्याने बरोबर हेरली आणि त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही नेमकी काय चूक आहे, ते पहा..

Matka King : 'मटका किंग'मध्ये नागराज मंजुळेंकडून मोठी चूक; नेटकऱ्याने बरोबर हेरली, पहा व्हिडीओ
Matka KingImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2026 | 2:05 PM
Share

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये अभिनेता विजय वर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. नागराज मंजुळेंनी या सीरिजसाठी काही मराठी कलाकारांचीही निवड केली आहे. त्यात विजय वर्माची ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारून अभिनेत्री सई ताम्हणकर भाव खाऊन जातेय. तर दुसरीकडे सिद्धार्थ जाधवने साकारलेली दगडू विचारेचीही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. परंतु या सीरिजमधील एक मोठी चूक एका नेटकऱ्याने अचूक हेरली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत या युजरने ही चूक सर्वांच्या लक्षात आणून दिली आहे.

‘मटका किंग’ या सीरिजच्या सुरुवातील जेव्हा विजय वर्मा कामगारांना मालाची ने-आण करण्याबाबत विचारतो, तेव्हा कोणीही उत्तर देत नाही. अशा वेळी हातगाडीवर झोपलेला दगडू (सिद्धार्थ) उठतो आणि ते काम करण्यास तयार होतो. या सीनमध्ये सिद्धार्थच्या पायाकडे कॅमेराचा फोकस पहायला मिळतो. तो एका पायानं अधू असतो, त्यामुळे तो लंगडत चालतो. नंतर एका सीनमध्ये मात्र हाच दगडू अजिबात न लंगडता एकदम व्यवस्थित चालताना दिसतो. हीच चूक या नेटकऱ्याने हेरली आणि त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही चूक नागराज मंजुळेंकडून कशी झाली, असा सवाल त्याने केला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘चांगलं निरीक्षण आहे’ असं एकाने म्हटलं. तर ‘आयुष्यात तुझ्याकडे किती वेळ आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. जरी या सीनमध्ये चूक झाली असली तरी सिद्धार्थच्या दमदार अभिनयाचं मात्र सर्वजण कौतुक करत आहेत. सिद्धार्थ जाधवची ही पहिली वेब सीरिज आहे. ही संधी दिल्याबद्दल त्याने नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट लिहिली होती.

‘माझ्या आयुष्यातली पहिली वेब सीरिज, ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली.. दगडू विचारे नावाचं पात्र तू मला साकारायला दिलंस, माझ्यावर विश्वास टाकलास. ॲमेझॉन प्राइमसारखा प्लॅटफॉर्म, सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम यांच्यासारखे निर्माते, आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, क्रितिका कामरा, गुलशन ग्रोवर सर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. नटाला प्रत्येक वेळेला चांगलं काम करायची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहिलेला डायलॉग तुलाच सारखा सारखा ऐकवतो.. “शुक्रिया सेठ.. काम देने के लिए नही.. भरोसा रखने के लिये,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप