MC Stan | लाइव्ह कॉन्सर्टमध्ये घडलेली घटना पाहून एमसी स्टॅनने मध्येच थांबवलं गाणं अन्..

पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन ऊर्फ अल्ताफ शेख हा नुकताच ‘बिग बॉस 16’चा विजेता ठरला. या शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे.

MC Stan | लाइव्ह कॉन्सर्टमध्ये घडलेली घटना पाहून एमसी स्टॅनने मध्येच थांबवलं गाणं अन्..
MC StanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 2:00 PM

हैदराबाद : ‘बिग बॉस 16’चं विजेतेपद पटकावलेला रॅपर एमसी स्टॅन सध्या देशभरात लाइव्ह कॉन्सर्टद्वारे परफॉर्म करत आहे. एमसी स्टॅनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि बिग बॉस जिंकल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्याने ‘इंडिया टूर’ची घोषणा केली. नुकतंच त्याने हैदराबादमध्ये लाइव्ह परफॉर्म केलं. मात्र या कॉन्सर्टदरम्यान अशी गोष्ट घडली, ज्यानंतर चाहते एमसी स्टॅनचं कौतुक करत आहेत. कॉन्सर्टदरम्यान एक चाहता पडल्यानंतर त्याची मदत करण्यासाठी स्टॅनने परफॉर्म करणं मध्येच थांबवलं. त्याच्या याच चांगुलपणाचं कौतुक चाहते करत आहेत.

रेडिटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन परफॉर्म करताना मधेच थांबल्याचं पहायला मिळत आहेत. चाहत्याला लागल्याचं कळताच त्याने विनंती केली, “सावकाश मित्रांनो.. एक जण खाली पडला आहे, असं वागू नका. म्युझिक थांबवा. हैदराबादकरांनो, असं करू नका. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर पडली आहे. तुम्ही ठीक आहात का?”

हे सुद्धा वाचा

“मला शेवटपर्यंत परफॉर्म करायचं आहे. मी पुन्हा हेच सांगतोय. नाहीतर मला पोलीस मधेच थांबवतील आणि इथून जाण्यास सांगतील. त्यामुळे तुम्ही गोंधळ घालू नका”, असं तो म्हणतो. मात्र गर्दी वाढतच गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी त्याचं कॉन्सर्ट लवकर बंद करण्यास सांगितलं.

हैदराबादमधील या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एमसी स्टॅनने जवळपास दीड तास परफॉर्म केलं. काही नेटकऱ्यांनी एमसी स्टॅनच्या वागणुकीचं कौतुक करत असतानाच ट्रेविस स्कॉटच्या कॉन्सर्टची आठवण केली. 2021 मध्ये ट्रेविस स्कॉटच्या कॉन्सर्टदरम्यान चेंगराचेंगरीमुळे 10 जणांनी आपले प्राण गमावले होते. चाहते मदतीसाठी ओरडत असतानाही या अमेरिकन रॅपरने त्याचं गाणं सुरूच ठेवलं होतं. चेंगराचेंगरी होत असतानाही शो सुरूच होता.

पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन ऊर्फ अल्ताफ शेख हा नुकताच ‘बिग बॉस 16’चा विजेता ठरला. या शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे. ‘तडीपार’ आणि ‘इन्सान थे’ हे एसमी स्टॅनचे दोन बॅक टू बॅक अल्बम्स हिट झाले आणि त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. देसी हिप-हॉपमध्ये त्याने स्वत:ची वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनचा स्वभाव चाहत्यांना जवळून पाहता आला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.