अचानक एक्स बॉयफ्रेंडची एन्ट्री, त्याच्यासाठी ठरलेलं लग्न मोडलं, अन् तोच पळून गेला; अभिनेत्रीचा भयानक अनुभव
ब्रेक अप झाल्यावर अभिनेत्रीने घरच्यांच्या पसंतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न ठरलं, साखरपुड्याच्याच दिवशी अचानक एक्स बॉयफ्रेंडची एन्ट्री झाली. त्याच्या सांगण्यावरून अभिनेत्रीने ठरलेलं लग्न मोडलं पण त्यानंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.

चित्रपटसृष्टीत लग्न, अफेअर, घटस्फोट या गोष्टी अगदी सामान्य झाल्या आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या नात्यांबद्दल मुलाखतींमध्ये मोकळेपणाने बोलताना दिसतात. असाच लग्नाचा अनुभव एका अभिनेत्रीनेही सांगितला आहे.
प्रियकरासाठी ठरलेलं लग्न मोडलं अन्…
या अभिनेत्रीने तिच्या प्रियकराशी लग्नाचा निर्णय घेतला पण त्याने नकार दिला म्हणून तिने त्याच्याशी नात तोडलं अन् घरच्यांच्या पसंतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड परत आला तेव्हा जे झालं तो अनुभव नक्कीच धक्कादायक असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. ही अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ.
मीरा जगन्नाथ हे मराठी मालिका विश्वातील एक ओळखीचं नाव आहे. तिने “माझ्या नवऱ्याची बायको” आणि “ठरलं तर” या मालिकांमध्ये काम केलं आहे.पण मीराला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामुळे. या सीझनमध्ये मीरा जगन्नाथ हे नाव खूप गाजलं.
अभिनेत्रीचा लग्नाबाबतचा धक्कादायक किस्सा
एका मुलाखती दरम्यान मीराने तिच्या आयुष्यातील लग्नाबाबतचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. मीरा एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्यावेळी हा मुलगा तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार नव्हता. याच कारणाने मीराने त्या मुलाशी नाते तोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
मीराचे लग्न दुसऱ्या एका मुलासोबत जुळलं. लग्नाची आणि साखरपुड्याची तारीखही ठरली. साखरपुड्यानंतर अवघ्या आठवड्याभरात तिचे लग्न होतं. सगळं काही सुरळीत सुरू असताना साखरपुड्याच्या दिवशी जवळपास सहा महिन्यांनी तिच्या बॉयफ्रेंडने तिला कॉल आला.
View this post on Instagram
एक्स बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून लग्न मोडलं
मीराच्या बॉयफ्रेंडने तिला “हे लग्न करू नको. मी आलोय, मला येऊन भेट.” असं सांगितलं. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मीराने साखरपुडा मोडला आणि बॉयफ्रेंडला भेटायला निघून गेली. मात्र झालं काहीतरी भलतंच. मीराचा बॉयफ्रेंड तेव्हा तिला भेटायलाच आला नाही. नाही पुन्हा त्याने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे मीरला याचा मोठा धक्का बसला. तिचं ठरलेलं लग्न मोडलं अन् घरच्यांचाही राग तिला सहन करावा लागला. तिला आलेला हा अनुभव अतिशय भयानक असल्याचं मीराने सांगितलं.
