AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2 चे सूत्रसंचालन

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 1 ने धमाल केलीये. चाहत्यांच्या मनावर अधिराज्य मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 1 गाजवले. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2 ची आतुरतेने वाट पाहत होते, शेवटी आता तो दिवस जवळ आलाय.

सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2 चे सूत्रसंचालन
| Updated on: May 28, 2023 | 7:48 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाहवर सुरु होतंय गाण्याचं दुसरं पर्व अर्थातच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Mi Honar Superstar Chhote Ustad). पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर लहानग्यांच्या सुरांची मैफल अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली, ‘एका सिनेमाच्या (Movie) प्रमोशनच्या निमित्ताने मी छोटे उस्तादच्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते.

ज्या पद्धतीचं टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून भारावून गेले 

या मंचावरचं टॅलेण्ट पाहून मी भारावून गेले होते. इतका भरभरुन प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला. याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या पद्धतीचं टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होतं. इतक्या लहान वयात एवढा आत्मविश्वास पाहून खरंच मी भारावले आहे. सूत्रसंचालन नक्कीच आव्हानात्मक आहे कारण इथे प्रसंगावधान राखावं लागतं.

या कार्यक्रमाची खूप जास्त उत्सुकता नक्कीच आहे 

लहान मुलांसोबत जमवून घेणं आणि त्यांची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला लहान मुलं प्रचंड आवडतात त्यामुळे या कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे. खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. मी नेहमीच वेगवेगळे लूक्स आणि स्टाईल ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनवे लूक्स करण्याची संधी मिळणार आहे.

माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे

माझ्या सूत्रसंचालनाची सुरुवात स्टार प्रवाहमुळेच झाली. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता. सूत्रसंचालन ही कला आहे. स्टार प्रवाहने माझ्यातला हा पैलू मला शोधून दिल्याबद्दल मी आभारी आहे अशी भावना वैदेहीने व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.