साठीच्या उंबरठ्यात अभिनेत्याचं 26 वर्षीय तरुणीसोबत लग्न, टोमण्यांमुळे नात्यात दुरावा? म्हणाला…

Actor Life: साठीच्या उंबरठ्यात पोहोचलेल्या अभिनेत्याने 26 वर्षीय तरुणीसोबत मोठ्या थाटात उरकलं दुसरं लग्न... टोमण्यांमुळे नात्यात दुरावा? काय म्हणाला अभिनेता..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

साठीच्या उंबरठ्यात अभिनेत्याचं 26 वर्षीय तरुणीसोबत लग्न, टोमण्यांमुळे नात्यात दुरावा? म्हणाला...
| Updated on: Mar 24, 2026 | 1:12 PM

Actor Life: झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खुद्द अभिनेत्याने देखील त्याच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 2006 मध्ये झालं, पण पहिल्या पत्नीसोबत त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेत नातं संपवलं. त्याने 22 एप्रिल 2018 मध्ये वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला… दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्याने यावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता मिलिंद सोमण आहे. 2018 मध्ये मिलिंद याने 26 वर्षीय अंकिता कोंवर हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्याला अनेकांना टोमणे मारले… पण या टोमण्याचा परिणाम अभिनेत्याच्या 26 वर्षीय बायकोवर झाला… अशा परिस्थितीत मिलिंद याने बायकोच्या बाजूने भक्कम उभा राहिला…

एका मुलाखतीत मिलिंद म्हणाला, ‘कोण काय बोलतंय याचा मला कोणताच फरक पडत नव्हता… पण अंकिता हिच्या मनावर खोलं परिणाम झालेला. कारण तिला फारसा अनुभव नव्हता… आम्ही याबद्दल चर्चा केली… मी तिला सांगितलं, टोमणे मारणाऱ्यांना तू ओळखत नाहीस आणि मी देखील ओळखत नाही… त्यामुळे ते जे काही बोलत आहेत, ते त्यांचे विचार आहेत… अंकिताने ही गोष्ट फार लवकर समजून घेतली… त्यामुळे याचं श्रेय पूर्णपणे तिला जातं… तिची समज घातल्यानंतर, तिने ट्रोलिंगबद्दल कधीच विचार केला नाही आणि मला असं वाटतं याच कारणामुळे आमचं नातं आणखी घट्ट झालं आहे. पूर्वीपेक्षा जास्त लोकांनी आता आमच्या नात्याता स्वीकार केला आहे… याची मला काहीही गरज नाही. पण चांगलं वाटतं, लोकांना या गोष्टीचा आनंद आहे की, आमच्या नात्याला आता 13 वर्षांचा काळ लोटला आहे.’

पुढे मिलिंद म्हणाला, ‘ती माझ्यापेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे तिचे विचार, संस्कार आणि ज्या वातावरणात ती वाढली आहे, ते फार वेगळं आहे. तिचे विचार देखील वेगळे आणि चांगले आहेत. मराठी आहे आणि ती आसामी… त्यामुळे खाण्याच्या सवयी आमच्या वेगळ्या आहेत. पण आम्ही कायम एकमेकांना समजून घेतो आणि ती माझ्या आयु्ष्यात आल्यामुळे माझं आयुष्य आणखी चांगलं झालं आहे…

Follow Us