
शोभिता धुलिपाला एक मॉडेल आणि भारत अभिनेत्री आहे. 2013 मध्ये शोभिता मिस इंडिया किसानमध्ये दुसर्या स्थानावर आली होती. शोभिता भरतनाट्यम आणि कुचीपुडीमधील एक प्रशिक्षित शास्त्रीय नर्तक आहे.

शोभिता तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते आणि चाहत्यांनाही तिची स्टाईल आवडते.

शोभिताने अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

या चित्रपटासाठी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये शोभिताला बेस्ट सपोर्टिंग परफॉरमेंससाठी नामांकन देण्यात आलं होतं.

यानंतर शोभिता सैफ अली खानचा चित्रपट शेफमध्ये दिसली.

मेड इन हेवन या वेब सीरिजमधून शोभिता धुलिपाला बरीच प्रसिद्धी मिळाली.

2018 मध्ये शोभितानं तेलुगू इंडस्ट्रीमध्ये टीक्का गुडाचारी या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

शोभिता घोस्ट स्टोरीज मधील अनुराग कश्यपच्या सेगमेंटमध्येही दिसली होती. मात्र याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

आता शोभिता लवकरच ‘मंकी मॅन’ नावाच्या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.