AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मुलीचा बॉलिवूड सुपरस्टारने केला सांभाळ; आज ती उत्तम अभिनेत्री, हॉलिवूड अभिनेत्यालाही केलंय डेट

एका सुपरस्टार अभिनेत्याने कचऱ्यात सापडलेल्या मुलीला दत्तक घेतलं. तिला वडिल म्हणून स्वत:चं नाव दिलं. एवढंच नाही तर तिला शिक्षणासाठी अमेरिकेतही पाठवलं. आज ती मुलगी उत्तम अभिनेत्री आहे. 

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मुलीचा बॉलिवूड सुपरस्टारने केला सांभाळ; आज ती उत्तम अभिनेत्री, हॉलिवूड अभिनेत्यालाही केलंय डेट
Dishani Chakraborty picImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 06, 2025 | 4:20 PM
Share

बॉलिवूडमधील अनेकांनी अनाथ मुलींना दत्तक घेतल्याचं आपण ऐकलं आहे. पण अजून एक असा बॉलिवूड सुपरस्टार आहे ज्यांनी एका मुलीला चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेत स्वत:च्या मुलीसारखा सांभाळ केला. तिला वडिल म्हणून स्वत:चं नाव दिलं आहे. नंतर ही मुलगी नंतर पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत घेतलं.

तिच्या पालकांनी जन्मानंतर मुलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून दिले होते.

हे सुपरस्टार म्हणजे मिथुन चक्रवर्ती. मिथुनदा बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. या काळात त्यांनी रुपेरी पडद्यावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्याने केवळ हिंदीच नाही तर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिथुन त्यांच्या व्यावसायिक जीवनातही हिट ठरले आहेत. मिथून हे चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत राहिले. मिथुन यांनी योगिता बालीशी लग्न केले आणि या लग्नातून त्यांना महाक्षय, ऊष्मे और नमाशी चक्रवर्ती ही मुले आहेत. याच दरम्यान त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं. दिशानी चक्रवर्ती नावाची एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली. दिशानीला तिच्या पालकांनी तिच्या जन्मानंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून दिले होते. जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हा मिथुन यांनी लगेच कोलकाता गाठले आणि त्या मुलीला दत्तक घेतले.

अभिनेत्याने मुलीला आश्रय दिला

मिथुन यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी योगिता बाली यांचा कोणताही आक्षेप नव्हता. दिशानी मोठी होत असताना, ती मिथुन आणि योगिताची लाडकी बनली. भारतात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिशानी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. दिशानीला अभिनेत्री व्हायचं होतं आणि त्यासाठी तिने न्यू यॉर्कच्या फिल्म अकादमीमध्ये प्रवेश घेतला. 2017 मध्ये तिने गिफ्ट हा लघुपटही केला आणि तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर दिशानीने अंडरपास, होली स्मोक, टू फेस्ड आणि व्हाय डिड यू डू इट सारखे चित्रपट केले. ती शेवटची द गेस्ट (2022) या लघुपटात दिसली होती.

 हॉलिवूड अभिनेत्याला केलं आहे डेट

याशिवाय ती इंस्टाग्रामवरही बरीच सक्रिय असते. इंस्टाग्रामवर दिशानीचे सुंदर आणि उत्तम व्हिडिओ आहेत. दिशानीने हॉलिवूड अभिनेता कोडी सुलेकलाही डेट केले आहे. सध्या ती एका परदेशी मुलासोबत चर्चेत आहे. या परदेशी मुलाचे नाव माइल्स मंटजारिस आहे. दिशानी अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या रोमँटिक फोटोंनी भरलेले आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष