AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider | ‘मी या तारखेला मुंबईत येतोय, रोखून दाखवा’, अमित जानीच मनसेला डायरेक्ट चॅलेंज, VIDEO

Seema Haider | सीमा हैदरवर बनणाऱ्या 'कराची टू नोएडा' चित्रपटावरुन मुंबईत राडा होण्याची शक्यता. मनसेने आक्रमक भूमिक घेतली आहे. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!" असा इशारा मनसेने दिला आहे.

Seema Haider | 'मी या तारखेला मुंबईत येतोय, रोखून दाखवा', अमित जानीच मनसेला डायरेक्ट चॅलेंज, VIDEO
Seema Haider
| Updated on: Aug 14, 2023 | 11:48 AM
Share

मुंबई : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सुरुवातीपासून चर्चेत आहे. एकवेळ सीमा हैदरवर हेरगिरीचा आरोप झाला. आता ती तिच्यावर बनणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यूपीचे अमित जानी सीमा हैदरवर ‘कराची टू नोएडा’ चित्रपट बनवत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धमकी दिलीय. “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत?”

“हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!” असा इशारा मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

‘रोखून दाखवा’

आता अमित जानी यांनी मनसेवर पलटवार केलाय. त्यांनी मनसेच्या धमकीला उत्तर दिलय. “चित्रपट निर्मात्यांना धमकावणं, त्यांच्याकडून वसुली करणं हे मनसेच काम आहे. मी मनसेच्या हल्ल्याच्या धमकीला अजिबात घाबरत नाही. अमित जानी 19 तारखेला मुंबईत येणार. तुम्ही अमित जानीला रोखू शकत नाही” असं प्रत्युत्तर ‘कराची टू नोएडा’ चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी दिलाय.

‘म्हणून राज ठाकरेंची पार्टी चिडलीय’

अमित जानी उत्तर प्रदेशच्या मेरठचे निवासी आहेत. “उत्तर प्रदेश-बिहारचे प्रोड्युसर, अभिनेते आणि प्रोडक्शन हाऊस चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामुळे राज ठाकरेची पार्टी चिडली आहे. मुंबईला बसलेल्या लोकांच्या हाताला हा चित्रपट लागला नाही. म्हणून ते नाराज आहेत” असं अमित जानी म्हणाले. ‘मुंबईतच काम करणार’

“मनसेमुळे आम्ही एका मराठी खासदाराला अनेक तास बंधक बनवून ठेवलं होतं. आम्ही यूपीतील शिवसेनेच्या कार्यालयात तोडफोड केली होती” असं अमित जानी म्हणाले. “आम्ही या चित्रपटावर मुंबईतच काम करणार आणि कोणाच्या धमकीला घाबरणार नाही” असं पलटवार अमित जानी यांनी केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?