AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rocket Boys Review : भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांच्या संघर्षाची गोष्ट, दिग्दर्शकाचं रॉकेट मात्र क्रॅश

स्वतंत्र भारताने गेल्या 70 वर्षांत काहीच मोठं काम केलं नाही, असं म्हणणाऱ्या लोकांना सणसणीत उत्तरं ठरतील अशी अनेक कामं भारताने केली आहेत. त्यापैकी दोन प्रमुख गोष्टी म्हणजे भारताकडे स्वतःचा अनूबॉम्ब आणि अणूभट्टी आहे. तर दुसरी गोष्टी म्हणजे अंतराळ क्षेत्रात भारताने केलेली प्रगती. या दोन गोष्टी होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांनी साध्य केल्या. त्याचा पाया या दोघांनी रचला.

Rocket Boys Review : भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांच्या संघर्षाची गोष्ट, दिग्दर्शकाचं रॉकेट मात्र क्रॅश
Rocket Boys (Photo : SonyLIV Instagram)
| Updated on: Feb 06, 2022 | 6:09 PM
Share

श्रीमंतांच्या घरातली दोन मुलं जी परदेशात शिकत आहेत. दुसऱ्या महायुद्धामुळे दोघांनाही परदेशातील शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावं लागतं. देशाची स्थिती पाहून काहीतरी करण्याची मोठी इच्छाशक्ती या दोघांमध्ये आहे. दोघांचाही आपापली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास आणि संघर्ष आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळेल. या प्रवासात दोघांची मैत्री त्यांची भांडणं, भर रस्त्यात बस थांबवून प्रेम व्यक्त करणं, घरच्यांपासून लपवून लग्न करणं, जिच्यावर आपलं खूप प्रेम आहे तिच्या लग्नात अचानक वऱ्हाडी म्हणून जाणं, अशा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी पाहायला मिळतील. त्याचबरोबर या दोघांपैकी एकाला भारताला अणूउर्जा क्षेत्रात सक्षम बनवायचं आहे, त्याला हा देश Father of the Indian nuclear Programme म्हणून ओळखतो. तर दुसऱ्याला देशाचं पहिलं रॉकेट उडवायचं आहे, त्याला आपण Father of the Indian Space Program म्हणून ओळखतो. होय ही गोष्ट आहे. शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा (Homi J. Bhabha) आणि विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांची. दिग्दर्शक अभय पन्नू यांनी निखिल अडवाणी (Creator) यांच्या सहाय्याने भाभा आणि साराभाई यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट बॉईज’ (Rocket Boys) ही 8 एपिसोड्स असलेली वेब सिरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली आहे.

‘रॉकेट बॉईज’ या सिरीजचं नाव वाचून अनेकांना वाटलं होतं की, रॉकेट वैज्ञानिकांवर आधारित हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांप्रमाणेच हीदेखील साधी गोष्ट असेल. परंतु या वेब सिरीजचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रत्येक जण या दोन मुलांच्या प्रेमात पडू शकतो. ही केवळ रॉकेट उडवणे किंवा अणुभट्ट्या बांधण्यापुरती मर्यादित गोष्ट नाही. दिग्दर्शकांनी दोन्ही वैज्ञानिकांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर या सिरिजद्वारे प्रकाश टाकला आहे. ‘रॉकेट बॉईज’ ही गोष्ट भारताची भारत बनण्याची कहाणी आहे. तो भारत, ज्याला परकीय शत्रूंपासून धोका नसेल. त्याचबरोबर देशात लपलेल्या देशद्रोह्यांपासूनदेखील हा सुरक्षित राहील. 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान होमी जहांगीर भाभा यांच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रस्तावापासून या कथेची सुरुवात होते आणि नंतर 22 वर्षे मागे जाते आणि ते भारत अणू सक्षम होईपर्यंत तसेच देशाचं पहिलं रॉकेट अवकाशात झेप घेईपर्यंत जाते.

‘रॉकेट बॉईज’ ही भाभा-साराभाईंच्या सघर्षाची गोष्ट

स्वतंत्र भारताने गेल्या 70 वर्षांत काहीच मोठं काम केलं नाही, असं म्हणणाऱ्या लोकांना सणसणीत उत्तरं ठरतील अशी अनेक कामं भारताने केली आहेत. त्यापैकी दोन प्रमुख गोष्टी म्हणजे भारताकडे स्वतःचा अनूबॉम्ब आणि अणूभट्टी आहे. तर दुसरी गोष्टी म्हणजे अंतराळ क्षेत्रात भारताने केलेली प्रगती. या दोन गोष्टी होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांनी साध्य केल्या. त्याचा पाया या दोघांनी रचला. पण ही गोष्ट करणं सोपं काम नव्हतं. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ‘रॉकेट बॉईज’ ही त्यांच्या सघर्षाची गोष्ट आहे.

Rocket Boys (Photo : SonyLIV Instagram)

एपीजे अब्दुल कलाम यांची एंट्री

‘रॉकेट बॉयज’ ही कथा भाभा आणि साराभाई या दोन शास्त्रज्ञांची असली तरी यात भारताच्या आणखी एका लाडक्या शास्त्रज्ञाचीदेखील गोष्ट आहे. तो लाडका शास्त्रज्ञ म्हणजे भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम. भारताच्या पहिल्या रॉकेट लाँच मोहिमेत कलामदेखील होते. ही मोहीम या सिरीजमध्ये असल्यामुळे कलाम यांचा सुरुवातीचा प्रवास या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कलाम यांची सिरीजच्या उत्तरार्धात एंट्री होते. अर्जुन राधाकृष्णन (Arjun Radhakrishnan) यांनी सिरीजमध्ये कलाम यांची भूमिका निभावली आहे.

जिम सर्भसह कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय

‘रॉकेट बॉईज’चा जीव म्हणजे यामधील कलाकार आणि त्यांची तांत्रिक टीम. या सिरीजमध्ये होमी जहांगीर भाभा यांची भूमिका अभिनेता जिम सर्भ (Jim Sarbh) याने निभावली आहे. तर विक्रम साराभाईंच्या भूमिकेत इश्वाक सिंह (Ishwak SIngh) दिसेल. दोघांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जय वीरूसारखी संपूर्ण सिरीज बांधून ठेवली आहे. दोघांनीही उत्कृष्ट अभिनय केला आहे. मृणालिनी साराभाईच्या व्यक्तिरेखेतील रेजिना कॅसांड्रानेही उत्तम काम केलं आहे. सबा आझाद पिप्सीच्या (परवाना इराणी – Saba Azad) भूमिकेत आहे. हृतिक रोशनची मिस्ट्री गर्ल म्हणून सबा सध्या चर्चेत आहे. Dibyendu Bhattacharya यांनी रजा मेहदी आणि Rajit Kapoor यांनी जवाहरलाल नेहरुंच्या भूमिकेत लक्ष्यवेधी काम केलं आहे. ही दोन पात्रदेखील सिरीज संपल्यानंतर लक्षात राहतात.

Rocket Boys

Rocket Boys (Photo : SonyLIV Instagram)

फॅमिली एंटरटेनर

ही सिरीज फॅमिलीसोबत बसून पाहण्यासारखी आहे. या सिरीजमध्ये कुठेही आक्षेपार्ह दृष्य नाहीत, शिवराळ भाषा नाही. त्यामुळे ही एक फॅमिली एंटरटेनर सिरीज आहे. यात अगदी शेवटच्या एपिसोडमध्ये केवळ एक शिवी आहे.

उत्तम सिनेमॅटोग्राफी

सिरीजमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिरीजचं छायाचित्रण. सिनेमॅटोग्राफर हर्षवीर ओबेरॉयने त्याचं काम चोख बजावलं आहे. 1940 ते 1963 या काळातील भारताची कहाणी सांगणारी ही सिरीज पाहताना, प्रत्येक सीन तुम्हाला त्या काळात घेऊन जातो.

सिरीजमधील उणिवा

ही वेबसिरीज मस्ट वॉच असली तरी सिरीजचा दिग्दर्शक काही ठिकाणी कमी पडला आहे असं जाणवतं. ‘रॉकेट बॉयज’च्या टीमचा कॅप्टन अभय पन्नू याची दिग्दर्शक म्हणून ही पहिलीच सिरीज आहे. ही गोष्ट बऱ्याचदा जाणवते. निखिल अडवाणीचा सहाय्यक असलेल्या अभय पन्नूने कारकिर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात चांगलं काम केलं आहे. परंतु या सिरीजचा विषय जितका दमदार होता, सिरीज त्याला साजेशी वाटत नाही.

या सिरीजचं संगीत, पार्श्वसंगीत जेमतेमच आहे. या बाबतीत सिरीज थोडी मागे पडली आहे, असं वाटतं. या सिरीजमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने मांडण्यात आली आहे, त्यावरून त्यांना जाणीवपूर्वक कमजोर दाखवण्यात आले आहे असे दिसते. मात्र हा वेगळा चर्चेचा विषय असू शकतो. याशिवाय सिरीजमधील अनेक संवाद इंग्रजीत असल्याने इंग्रजी न समजणाऱ्या प्रेक्षकांशी ही सिरीज कनेक्ट होत नाही.

  • सिरीज : Rocket Boys
  • दिग्दर्शक : अभय पन्नू
  • कलाकार : जिम सर्भ, इश्वाक सिंह, रेजिना कॅसांड्रा, सबा आझाद. दिव्येंद्यू भट्टाचार्य, रजित कपूर, अर्जुन राधाकृष्णन
  • ओटीटी प्लॅटफॉर्म : सोनी लिव्ह
  • स्टार्स : 3

ट्रेलर पाहा 

इतर बातम्या

Minnal Murali Movie Review: जबरदस्त स्टोरीटेलिंग, शानदार अभिनय, केरळमधल्या खेड्यातला देसी सुपरहिरो मार्वेल-डीसीपेक्षा वरचढ

Karnan : एका गावाच्या अस्तित्वाची लढाई, कलाकारांचा अफलातून अभिनय, मुक्या जनावरांद्वारे सामाजिक व्यवस्थेवर प्रश्न आणि बरंच काही…

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...