मला नियंत्रित करू नकोस…संसदेत भडकल्या जया बच्चन, थेट शिवसेनेच्या खासदारालाच…

जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटात गाजवला आहे. राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. यावेळी समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरवरून सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी असे काही घडले की, जया बच्चन यांनी थेट फटकारले.

मला नियंत्रित करू नकोस...संसदेत भडकल्या जया बच्चन, थेट शिवसेनेच्या खासदारालाच...
Jaya Bachchan
| Updated on: Jul 31, 2025 | 8:15 AM

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. यावेळी समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावावर सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, यादरम्यान जया बच्चन या बोलत असताना असे काही घडले की, थेट त्यांचा पाराच चढला आणि त्यांनी एका महिला खासदाराला चांगलच झापलं. जया बच्चन यांचा राग सर्वांनाच माहिती आहे, मग ठिकाण कोणतेही असो, जया बच्चन या बोलल्याशिवाय राहत नाहीत. 

जया बच्चन यांचा संताप 

जया बच्चन या भावूक होत म्हणाल्या की, जेव्हा या हल्ल्यात अनेक महिलांचा सिंदूर गेला मग त्या प्रत्युत्तराच्या कारवाईला तुम्ही ‘सिंदूर’ असे नाव देणे हे खूप जास्त असंवेदनशील आहे. सरकारवर टीका करत त्यांनी म्हटले की, पहलगाम हल्ल्यानंतर लोकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. या हल्ल्यात या कुटुंबातील व्यक्ती गेले, ते कुटुंब सरकारला कधीही माफ करणार नाही. कारण त्या कुटुंबियांची कोणतीही माफी मागितली गेली नाहीये. 

थेट खासदाराचा फटकारले 

याच चर्चेदरम्यान जेव्हा इतर खासदारांनी जया बच्चन यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या संतापल्या. त्या स्पष्ट शब्दात म्हणाल्या, माझे कान तीक्ष्ण आहेत…मला सर्व काही ऐकू येते…जया बच्चन यांनी जवळ बसलेल्या शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना थेट म्हटले की, मला कंट्रोल करू नकोस. जया यांनी प्रियंका यांना फटकारले. यानंतर प्रियंका या हसताना दिसल्या. यावेळी जया बच्चन यांचे वेगळेच रूप बघायला मिळाले. 

ऑपरेशन सिंदूरवरून सरकारवर जोरदार टीका 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून मोठा गोंधळ सुरू असल्याचे बघायला मिळतंय. पहलगाममध्ये पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यातील धक्कादायक बाब म्हणजे चक्क पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याची अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली, ज्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.