अभिताभ – जया बच्चन यांच्या नात्यालाही गेला असता तडा? एका अटीमुळे टिकलं नातं, अनेक वर्षांनी मोठं सत्य समोर
Amitabh Bachchan - Jaya Bachchan: फक्त एका अटीमुळे टिकलं आहे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं लग्न, बिग बींची 'ती' अट मान्य केल्यानंतर जया बच्चन यांनी कारावा लागला मोठा त्याग.. अनेक वर्षांनंतर मोठं सत्य समोर...

Amitabh Bachchan – Jaya Bachchan: महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंबांपैकी आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 पेक्षा जास्त वर्ष झाली आहे. पण आजही दोघे अनेक ठिकाणी एकत्र आणि आनंदी दिसतात. फक्त एका अटीमुळे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं नातं इतके वर्ष टिकलं असं म्हणायला हरकत नाही. जया बच्चन यांना डेट करत असतानाच बिग बी यांनी एक अट घातली होती. ती अट नक्की कोणती होती जाणून घेऊ…
दोघांच्या स्टारडमबद्दल सांगायचं झालं तर, जया बच्चन प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असताना बिग बी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. जया यांच्यामुळे बिग बींना एका सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच सिनेमामुळे बिग बी यशाच्या शिखरावर पोहोचले. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ सिनेमा जया आणि बिग बी यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आणि चाहत्यांनी देखील दोघांना डोक्यावर घेतलं.
‘जंजिर’ सिनेमानंतर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी झाली. त्यानंतर दोघांची जोडी फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील हीट ठरली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं.
अमिताभ बच्चन यांची अट
लग्नाआधी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर जया बच्चन फार कमी काम करतील. ठराविक प्रोजेक्टमध्ये आणि चांगल्या लोकांसोबत जया बच्चन काम करतील… अशी अट बिग बी यांनी ठेवली होती आणि जया बच्चन यांनी ती मान्य देखील केली.
लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण जया बच्चन मात्र घर आणि मुलांमध्ये व्यस्त झाल्या. आज लग्नाच्या जवळपास 50 वर्षांनंतर देखील जया बच्चन आणि अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. जया बच्चन नुकताच ‘राजा रानी की प्रेम कहानी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटील आल्या होत्या.
