Mahakumbh Mela 2025 : अंबानी परिवाराचे महाकुंभमध्ये पवित्र स्नान, अनंत अंबानींकडून खास डब्याचे वाटप, त्यात काय होतं ?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबिय हे माघी पौर्णिमेपूर्वी , 11 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. त्यांनी गंगेत जाऊन पवित्र स्नान केले. त्यांच्यासोबत त्यांच्या चार पिढ्याही कुंभनगरीत पोहोचल्या. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबाने निरंजनी आखाड्याच्या पीठाधीश्वरांच्या उपस्थितीत गंगा पूजन केले.

Mahakumbh Mela 2025 : अंबानी परिवाराचे महाकुंभमध्ये पवित्र स्नान, अनंत अंबानींकडून खास डब्याचे वाटप, त्यात काय होतं ?
अंबानी कुटुंब
| Updated on: Feb 12, 2025 | 9:54 AM

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे नुकतेच महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. माघी पौर्णिमेपूर्वी ते सहकुटुंब 11 फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात सहभागी झाले. त्या सर्वांनी गंगेत स्नानही केले. यावेळी अंबानी कुटुंबाच्या तारही पिढ्या उपस्थित होत्या. त्यांच्या गंगा पूजनाचे, पवित्र स्नानाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुकेश अंबानी यांची आई कोकिला बेन, मुलगा आकाश, सून श्लोका, तसेच अनंत व राधिका आणि मुकेश अंबानी यांची नातवंड पृथ्वी आणि वेदा हे सगळेच कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंबाने निरंजनी आखाड्याच्या पीठाधीश्वरांच्या उपस्थितीत गंगा पूजन केले. यावेळी त्या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं.

अंबानी परिवाराचे गंगेत स्नान

त्रिवेणी स्नान केल्यानंतर अंबानी कुटुंब हे महाकुंभ दरम्यान बांधलेल्या परमार्थ निकेतन आश्रमात पोहोचले. कुटुंबाने आश्रमातील सफाई कामगार, बोट चालक आणि यात्रेकरूंना मिठाईचे वाटप केले. कुटुंबातील सदस्यही यात्रेकरूंना जेवण देताना दिसले.

 

यापूर्वीही अनेक दिगज्जांनी महाकुंभमध्ये सहभागी होऊन पवित्र स्नान केलं आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होत स्नान केलं. त्यानंतर आता संपूर्ण अंबानी कुटुंबही कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. आज असलेल्या माघ पौर्णिमेच्या स्नानाला विशेष महत्व असल्याने प्रयागराजमध्ये भाविकांची आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला असून 26 फेब्रुवारीपर्यंत हा मेळा चालणार आहे. दरवेळेसप्रमाणे यंदाही महाकुंभात साधू आणि भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. यामुळेच प्रवासी वाहतुकीचा विक्रम पुन्हा मोडला असून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 10 फेब्रुवारी रोजी 13915 प्रवाशांनी प्रयागराज विमानतळावरून प्रवास केला. 2019 मध्ये प्रयागराज नागरी विमानतळ सुरू झाल्यापासून एका दिवसातील प्रवासी वाहतुकीची ही सर्वाधिक संख्या आहे. प्रयागराज विमानतळाने जुना आकडा मोडून नवीन विक्रम स्वीकारण्याची महिनाभरातील ही नववी वेळ आहे. 10 फेब्रुवारी रोजी, प्रयागराज विमानतळावरून प्रथमच वेळापत्रकानुसार 80 विमाने निघाली आणि हा एक विक्रम आहे. तर एकूण विमानांची संख्या 112 होती. ज्यामध्ये 32 सनदी आले आणि गेले. 16 चार्टरमधून 64 विशेष प्रवासी आले आणि 65 विशेष प्रवासी तितक्याच चार्टरमधून निघाले.