AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Khanna | नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकले मुकेश खन्ना, थेट केला गंभीर आरोप, म्हणाले, लव्ह जिहादला प्रोत्साहन

बाॅलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करत नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले होते की, बाॅलिवूडच्या कलाकारांना कशाप्रकारे पुरस्कार मिळतात. यानंतर अनेकांनी नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली.

Mukesh Khanna | नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकले मुकेश खन्ना, थेट केला गंभीर आरोप, म्हणाले, लव्ह जिहादला प्रोत्साहन
| Updated on: Jun 09, 2023 | 9:10 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक विधान करत सर्वांनाच हैराण केले. नसीरुद्दीन शाह हे म्हणाले होते की, मी पुरस्कारांना अजिबात महत्व देत नाही. कारण कोणत्याच अभिनेत्याला त्याच्या अभिनयासाठी पुरस्कार हा मिळत नाही तर पुरस्कार (Award) हा एक लॉबिंगचा परिणाम असतो. मी मागचे दोन पुरस्कार घेण्यासाठी देखील गेलो नाहीये. इतकेच नाही तर मी माझ्या वॉशरूमच्‍या दाराचे हँडल म्‍हणून फिल्मफेअर अवॉर्ड्सचा वापर करतो. जो कोणी वॉशरूममध्ये (Washroom) जातो, त्याला दोन वेळा पुरस्कार दिला जातो.

नसीरुद्दीन शाह यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल देखील भाष्य करताना नसीरुद्दीन शाह दिसले. नसीरुद्दीन शाह म्हणाले की, मुस्लिमांविरोधात नफरत निर्माण करणे ही नवीन फॅशन तयार झालीये. एकदम चतुराईने लोक मुस्लिमांविरोधात नफरत निर्माण करत आहेत. या दरम्यान त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतू त्यांचा निशाना थेट द केरळ स्टोरीवर होता.

नसीरुद्दीन शाह यांच्या या सर्व विधानांचा समाचार हा थेट शक्तीमान अर्थात मुकेश खन्ना यांनी घेतला आहे. मुकेश खन्ना हे थेट नसीरुद्दीन शाह यांना खडेबोल सुनावताना दिसले. मुकेश खन्ना हे म्हणाले की, इतका चांगला कलाकार असे काही भाष्य करेल हे नसीरुद्दीन शाह यांच्याकडूनच कळाले. असे म्हणतात की, हिंदूस्थानमध्ये मुस्लिम सुरक्षित नाहीत.

श्रद्धा, अंकिता कांड, कानपूरच्या हनुमान मंदिरात तोडफोड सतत अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि म्हणतात की, आमच्या देशात मुस्लिम सुरक्षित नाही? अरे जर कोणी सुरक्षित नसेल तर 100 कोटी हिंदू…,तुम्ही कट्टर बनले आहात, जे एका अभिनेत्याला अजिबातच शोभत नाही. जर असेच असेल तर सहभागी व्हा लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या गॅंगमध्ये, विचार तुम्हाला करायचा आहे नाही तर लोक तुमचे चित्रपट बघणे बंद नक्कीच करतील. देवाने तुम्हाला सद्बुद्धि देवो.

आता मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मुकेश खन्ना यांना आता नेमका काय रिप्लाय नसीरुद्दीन शाह हे देतात हे बघण्यासारखे ठरणार आहे. नसीरुद्दीन शाह हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. आता हा वाद वाढण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.