AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट; गोळीबारासाठी वापरलेली पिस्तुल आणि…

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात देखील घेतले. हल्लेखोरांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले.

सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट; गोळीबारासाठी वापरलेली पिस्तुल आणि...
salman khan
| Updated on: Apr 22, 2024 | 10:04 PM
Share

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलला पहाटे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला लॉरेंस बिश्नोई याच्याकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेंस बिश्नोई याचाच भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील हल्लेखोरांना अटकही केलीये.

आता नुकताच या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेने सुरतमधील तापी नदीतून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारात वापरलेली एक पिस्तुल आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आज सकाळपासून तापी नदीमध्ये सर्च आपरेशन करत होते.

आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सर्च आपरेशन सुरू होते. सलमान खानच्या घरावर फायरिंग केल्यानंतर आरोपी भुजला पळून गेले होते. मात्र, त्या अगोदर त्यांनी फायरिंगमध्ये वापरलेली बंदूक तापी नदीच्या पाण्यात टाकून दिली होती. जी मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. आता या प्रकरणात असूनही काही मोठे खुलासे हे होऊ शकतात.

हल्लेखोरांनी चाैकशीमध्ये खुलासा केला की, त्यांना सलमान खानच्या घरावर 10 राऊंड फायर करण्याचे आदेश हे देण्यात आले होते. परंतू दुचाकीवरून त्यांना 10 राऊंड फायर करणे शक्य झाले नाहीत. चाैकशीमध्ये असून एक हैराण करणारी माहिती ही पुढे आलीये, या हल्लेखोरांना गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते.

हल्लेखोरांना बिहारमध्ये गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलिस अजूनही या प्रकरणात तपास करत आहेत. या प्रकरणात आरोपींना पैसे आणि शस्त्रे पुरविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. हे स्पष्ट आहे की, बिष्णोई टोळीपैकीच व्यक्तीने यांना पैसे आणि शस्त्रे पुरवली गेली. हल्लेखोरांना नेमके कुठे प्रशिक्षण दिले, याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जातोय.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा