AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Sharma चा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर… अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठी माहिती उघड

कायम आनंदी राहणाऱ्या तुनिशाने टोकाचा निर्णय का घेतला? शीजानच्या मेकअपरुममध्ये अभिनेत्रीने गळफास घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Tunisha Sharma  चा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर... अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठी माहिती उघड
श्रद्धा वालकर हत्येनंतर तुनिशा-शिझानचं ब्रेकअप? चौकशीत सत्य उघड Image Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 25, 2022 | 11:59 AM
Share

Tunisha Sharma postmortem report : अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर टीव्ही विश्वातच नाही, तर सर्वत्र खळबळ माजली आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉयफ्रेंड शीजान खानच्या (Sheezan Mohammed Khan) सोबत असलेल्या नात्यात आलेल्या वळणामुळे तुनिशा तणावाखाली होती आणि म्हणून अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचं कारण समोर येत आहे. आता अभिनेत्रीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठी माहिती समोर

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टममध्ये तुनिशाने गळफास घेतल्यामुळे निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री गरोदर असलेल्या चर्चांना पोलिसांनी फेटाळलं आहे. अभिनेत्रीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती समोर येत आहे.

तुनिशाने गळफास घेतल्यामुळे तिला श्वास घेता आला नसल्याचं रिपोर्टमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे तुनिशाने आत्महत्येपूर्वी 24 तासांत ज्या व्यक्तींसोबत फोनच्या माध्यमातून संपर्क साधला किंवा सेटवर तुनिशा ज्या व्यक्तींसोबत बोलत होती, त्या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली आहे. शीजान चौकशीला करत नाही सहयोग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीजान चौकशीला सहयोग करत नाही. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची शीजान उलटसुलट उत्तरं देत आहे. शीजानमुळेच तुनिशाने आत्महत्या केली असल्याचा आरोप अभिनेत्रीची आई करत आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कायम आनंदी राहणाऱ्या तुनिशाने टोकाचा निर्णय का घेतला? शीजानच्या मेकअपरुममध्ये अभिनेत्रीने गळफास घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

Follow Us
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक