AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Kulkarni : 5 तास झाले, नक्की काय झालंय? काय चाललंय?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्रॅफिक जामने वैतागली

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुंबईतील मानखुर्द येथे 5 तास वाहतूक कोंडीत अडकली. सायन-पनवेल महामार्गावर क्रेन कोसळल्याने ही कोंडी झाली, ज्यात एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील वाहतूक समस्येचा हा एक भयावह अनुभव होता, ज्यामुळे सोनालीसह अनेकांना मोठा मनस्ताप झाला. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मदतीचे आवाहन केले.

Sonali Kulkarni : 5 तास झाले, नक्की काय झालंय? काय चाललंय?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्रॅफिक जामने वैतागली
5 तास वाहतूक कोंडीत अडकली सोनाली कुलकर्णीImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2026 | 11:34 AM
Share

मुंबईतील वाहतूक कोंडी ही काही नवी असली तरी त्यामुळे होणारा त्रास, मनस्ताप हा लोकांसाठी खूप त्रासदायक ठरतो. सामान्य लोकांप्रमाणेच अनेकदा नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटीही या वाहतूक कोंडीत अडकून पडतात. असाच एक खेदजनक पण तितकाच वाईट अनुभव अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिलाही आला. मुंबईच्या वातहूक कोंडीत अडकल्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अक्षरश: हैराण झाली होती. मानखुर्दमध्ये पाच तास अडकल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नुकताच शेअर केला आहे. तिच्या मागे आणि पुढेही वाहनांची लांबच लांब रांग लागल्याने, परत फिरण्याचा मार्गही नसल्याने ती फ्रस्ट्रेट झाली होती. भरीस भर म्हणून, ही कोंडी नेमकी कशामुळे झाली, कधी सुटणार याचंही उत्तर कोणी देत नसल्याचं नमूद करत तिनेही वाहूतक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मदतीचं आवाहनही केलं.

काल रात्रीच्या सुमारास सोनाली कुलकर्णी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत हा व्हिडीओ टाकला. मुंबईहून पुण्याला जाताना तिला मानखुर्दमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर करून सोनालीने नाराजी व्यक्त केली.

सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी रात्री मानखुर्द जवळ (Mankhurd Traffic Jam) सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या क्रेनचा एक भाग कोसळला आणि त्यामध्ये एका नागरिकाने जीव गमावला. त्याच क्रेनचा भाग काढण्याचे प्रयत्न प्रशासन करत होतं, पण या घटनेमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली, आणि असंख्य प्रवाशांना त्याचा फटका बसला. अनेक लोक त्यात अडकून पडले होते.

काय म्हणाली सोनाली कुलकर्णी ?

सोनाली कुलकर्णी काल (बुधवारी, ता 29) पुण्याला निघाली होती, मात्र प्रवासादरम्यान मानखुर्द ब्रिजवर ती जवळपास पाच तास वाहतूक कोंडीत अडकली. एकाच ठिकाणी पाच तास अडकून पडल्याने ती आणि तिच्यासह अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. तेच तिने या व्हिडीओतून सांगितलं, आणि मानखुर्द ब्रिजवर, पुढे, मागे, वाहनांच्या लांबच्या लांब रांगा कशा लागल्या होत्या, हेदेखील तिने तिच्या व्हिडीओमध्ये दाखवलं.

“नमस्कार, मी आत्ता मानखुर्द ब्रिजवर आहे. जवळपास 5 तास झाले असून तेव्हापासून मी याठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकल्ये. मी पुण्याला चालले होते…पण, इथेच अडकले. माझ्या मागे आणइ पुढेही तुम्ही पाहू शकता की कसं ट्राफिक जाम झालं, वाहनांच्या कशा रांगा लागल्या आहेत, ते दिसतंय. खरंतर आम्ही ट्रॅफिक कंट्रोल टीमला सुद्धा फोन केला होता पण,त्यांनी आम्हालाच पेशन्स बाळगायचा सल्ला दिला. कारण, ही वाहतूक कोंडी खूप मोठी आहे. आणि ही वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन सगळं कधी पूर्ववत होईल, याची त्यांनीह कल्पना नाही. मागेही गाड्या आहेत, वळायला, परत फिरायलाही जागा नाहीये. जर कोणी विरुद्ध दिशेने मागे जात असाल, तर पुढे काय झालंय, ते तरी सांगाच. किंवा आमच्यासारख्या प्रवाशांची मदत करा. एकाच ठिकाणी 5 तासांपासून अडकणं हे अतिशय भितीदायक आहे,” असं सोनालीने तिच्या व्हिडीओ पोस्टमध्ये नमूद केलं.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत संताप व्यक्त केला. अनेक नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करतही वाहतूक कोंडी, मनस्ताप, त्रास याबद्दल नाराजी व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

Follow Us
मोठी बातमी! महाविकास आघाडीत ट्विस्ट; आगे, आगे देखो होता है क्या म्हणत
मोठी बातमी! महाविकास आघाडीत ट्विस्ट; आगे, आगे देखो होता है क्या म्हणत.
नीलम गोऱ्हे की शितल म्हात्रे? विधान परिषदेसाठी कोणाची वर्णी लागणार?
नीलम गोऱ्हे की शितल म्हात्रे? विधान परिषदेसाठी कोणाची वर्णी लागणार?.
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो.
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर...
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर....
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.