
Munawar Faruqui : ‘बिग बॉस 18’ चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मुनव्वर याने झगमगत्या विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण हा प्रवास मुनव्वर याच्यासाठी फार कठीण होता. आज रॉयल आयुष्य जगणाऱ्या मुनव्वर याच्यावर वयाच्या 13 व्या वर्षी कठीण परिस्थिती आली होती. जेव्हा मुनव्वर याने स्वतःच्या आईला गमावलं… आईचा मृतदेह पाहिल्यानंतर मुनव्वर याच्या नजरेत त्याचे वडील विलन ठरले होते.
नुकताच झालेल्या मुलाखतीत मुनव्वर याने आयुष्यातील कठीण वेळेबद्दल सांगितलं. मुनव्वर म्हणाला, ‘माझ्या आईचं कधीच कोणी कौतुक केलं नाही. ती खूप धाडसी होती. पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि कधीतरी सहनशक्ती संपते… मी 13 वर्षांचा होतो मला सकाळी कोणीतरी उठवलं आणि सांगितलं तुझी आई रुग्णालयात आहे. मी तिथे पोहोचल्यानंतर मला माहिती झालं की, कुटुंबिय बोलत होतो कोणाला माहिती नाही झालं पाहिजे… माझ्या आईने विष प्राशन केलं होतं. आईने असं का केलं मला आजूनही कळत नाही… एक नर्स होती, जी माझ्या आईच्या बाजूने होती, तिने खूप प्रयत्न केले, पण माझ्या आईने प्राण गमावले होते….’
पुढे मुनव्वर म्हणाला, ‘माझी आई आता राहिलेली नाही, या संकटाचं दुःख देखील मला करु दिलं नाही… जेव्हा माझी आई गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी मला खुप काही करावं लागलं… सतत मला सांगत होते रडू नको… आता तुलात सगळं सांभाळायचं आहे. माझ्यामुळे सर्वकाही झालं आहे… असं प्रत्येकाला वाटत होतं. मला माहिती पण नाही दुःखी कसं व्हायचं असतं…मी रडत होतो, मनात सर्वांसाठी फक्त राग होता… ज्यांनी माझ्या आईसोबत वाईट केलं, त्यांना मी एका वेळेनंतर माफ देखील केलं… ‘
आयुष्यात वडील का विलन ठरले याबद्दल देखील मुनव्वर याने मोठं वक्तव्य केलं. ‘सुरुवातीला मी प्रचंड रागात होतो… वडिलांचा मी फक्त आणि फक्त राग करत होतो… पण त्यांची प्रकृती पाहिल्यानंतर मी सर्वकाही विसरलो. शेवटी ते माझे वडील आहेत. आईच्या निधनानंतर माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आणि शरीराचा 80 टक्के भाग अर्धांगवायू झाला होता. मी स्वतःला सांगू लागलो की त्यांनी कोणतीही चूक केली असली तर, त्यांना त्याची शिक्षा मिळाली आणि त्यांनीही वेदना सहन केल्या. ‘ असं देखील मुनव्वर म्हणाला…