मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत अभिनेत्रीचं लग्न, लग्नाच्या 11 दिवसांनंतर झाली विधवा, नवऱ्याला गोळी लागल्यानंतर…
Bollywood Actress Married Life: मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत लग्न करणं अभिनेत्रीला पडलं महागात, 11 महिन्यात झाली विधवा, नवऱ्याला गोळी लागल्यानंतर... धक्कादायक होतं अभिनेत्रीचं आयुष्य..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Bollywood Actress Married Life: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत झगमगत्या विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. यापूर्वी लीना सुनील दत्त यांच्या अभिनेत्री म्हणून सिनेमामध्ये पदार्पण करणार होत्या, परंतु बदलत्या परिस्थितीमुळे सिनेमा प्रदर्शित करण्यात आला नाही. लीना यांनी सुमारे 21 वर्षा बॉलिवूडवर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या पण एक काळ असा देखील आला लीना यांनी अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं.
लीना यांनी वयाच्या 18 व्या वर्षी सुनील दत्त दिग्दर्शित ‘मन का मीत’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात लीना अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत झळकल्या. सिनेमा देखील हीट ठरला. 70 च्या काळा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त लीना यांचा बोलबाला होता…
बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर लीना यांनी वयाच्या 25 व्य वर्षी सिद्धार्थ बांदोडकर यांच्यासोबत लग्न केलं. सिद्धार्थ हे एका मोठ्या राजकीय कुटुंबातील होते, त्यांचे वडील दयानंद बांदोडकर हे गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री होते. लीना आणि सिद्धार्थचे लग्न ठरलं होतं, लग्नानंतर काही दिवसांनी लीना यांच्या नशिबात मोठं संकट आहे.
रिपोर्टनुसार, लीनाच्या पतीला बंदूक साफ करताना गोळी लागली. अशात सिद्धार्थ यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर सुमारे 11 दिवस उपचार करण्यात आले. पण सिद्धार्थ याचं निधन झालं आणि वयाच्या 25 व्या वर्षी लीना विधवा झाल्या.
पतीच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी, लीना यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण लीना यांचे वडील सुरुवातीला या नात्याला सहमत नव्हते कारण किशोर कुमारने आधीच तीन वेळा लग्न केलं होतं आणि ते लीनापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते.
अखेर किशोर कुमार आणि लीना यांचं लग्न झालं. किशोर आणि लीना यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव सुमीत कुमार आहे. लीना यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केल. पण अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत ‘मेहबूब की मेहंदी’ मधील त्यांच्या अभिनयाचं सर्वाधिक कौतुक झालं. सध्या लीना रिअॅलिटी शोमध्ये दिसतात
