मुनव्वर फारुकीने पहिल्यांदा दाखवला सावत्र मुलीचा चेहरा, दुसऱ्या पत्नीसोबत खास क्षण

Munawar Faruqui Step Daughter: मुनव्वर फारुकीचे दुसरी पत्नी आणि सावत्र मुलीसोबत खास क्षण, फोटो आले समोर, सध्या मुनव्वर फारुकी खासगी आयुष्यामुळे चर्चेत..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याच्या दुसऱ्या कुटुंबाची चर्चा...

मुनव्वर फारुकीने पहिल्यांदा दाखवला सावत्र मुलीचा चेहरा, दुसऱ्या पत्नीसोबत खास क्षण
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 8:38 AM

Munawar Faruqui Step Daughter: स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता मुनव्वर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चत आला आहे. काही दिवसांपूर्वी मुनव्वर याने खास पाहुण्याच्या उपस्थितीत दुसरं लग्न केलं. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट महजबीन कोटवाला हिच्यासोबत मुनव्वर याने लग्न केलं आहे. आता मुनव्वर याने दुसऱ्या पत्नीसोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या मुनव्वर याने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये मुनव्वर याने पहिल्यांदा सावत्र मुलीचा चेहरा दाखवला आहे. मुनव्वर याने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये त्याचा मुलगा दुसरी पत्नी आणि सावत्र मुलगी देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, मुनव्वर याचं लग्न मुंबईतील आयटीसी मराठा येथे झालं.

मुनव्वर याचं पहिलं लग्न

मुनव्वर याने त्याच्या पहिल्या लग्नाचा खुलासा ‘लॉकअप’ शोमध्ये केला होता. शो अभिनेत्री कंगना रनौत यांनी होस्ट केला होता. शोमध्ये मुनव्वर याने त्याच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांबद्दल सांगितलं होतं. कमी वयात मुनव्वर याचं लग्न पहिलं लग्न झालं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा देखील आहेत. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याच्या काही वर्षांनंतर मुनव्वर याने महजबीन कोटवाला हिच्यासोबत लग्न केलं.

महजबीन कोटवाला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, महजबीन हिचं देखील मुनव्वर याच्यासोबत दुसरं लग्न आहे. महजबीन कोटवाला हिला पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे. पहिला घटस्फोट झाल्यानंतर महजबीन कोटवाला हिने मुनव्वर याच्यासोबत लग्न केलं.

आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये महजबीन कोटवाला, मुनव्वर फारुकी यांच्यासोबत मुलगा आणि मुलगी देखील दिसत आहे. चौघे एकत्र आनंदी दिसत आहेत. सोशल मीडियावर मुनव्वर याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते देखील त्याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

मुनव्वर याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ जिंकल्यानंतर मुनव्वर याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याला आता सिनेमांमध्ये काम करण्यासाठी देखील ऑफर मिळत आहेत. मुनव्वर लवकरच अभिनय विश्वात पदार्पण करणार आहे. ‘फस्ट कॉपी’ या वेब सीरिजमध्ये मुनव्वर भूमिका साकारताना दिसणार आहे.

Non Stop LIVE Update
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.