‘नाळ 2’ चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे यांचा मोठा खुलासा, अखेर पाच वर्षांचा वेळ का लागला?

नागराज मंजुळे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. नागराज मंजुळे यांनी अनेक हिट चित्रपट दिली आहेत. नागराज मंजुळे यांचा आता नाळ 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे याबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ आहे.

'नाळ 2' चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे यांचा मोठा खुलासा, अखेर पाच वर्षांचा वेळ का लागला?
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 8:19 PM

मुंबई : नागराज मंजुळे यांनी एक अत्यंत मोठा काळ गाजवलाय. नागराज मंजुळे यांनी शुन्यातूनच आपले विश्व निर्माण केलंय. नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने एक धमाका केलाय. नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने तर धमाल केली. आर्ची आणि परशा यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अस्सल गावरानी तडका हा कायमच नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात बघायला मिळतो.

सध्या नागराज मंजुळे हे त्यांच्या आगामी नाळ 2 या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहेत. नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे नाळ 2 चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नाळ 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. हा चित्रपट धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नाळ हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले. नाळ 2 ची चाहते हे गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहताना दिसले. शेवटी आता हा चित्रपट रिलीज होतोय. नाळ 2 चित्रपट येण्यास तब्बल पाच वर्षांचा मोठा काळ लागलाय. याबद्दलच खुलासा करताना आता नागराज मंजुळे दिसले.

नागराज मंजुळे आणि नाळ 2 चित्रपटाची टीम टीव्ही9 मराठीच्या आॅफिसला पोहचली. यावेळी मनसोक्त गप्पा मारण्यात आल्या. यावेळी नागराज मंजुळे यांना विचारण्यात आले की, नाळ 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास इतका वेळ का लागला?. यावेळी बोलताना नागराज मंजुळे हे म्हणाले की, काही ठरलेच नव्हते की दुसरा भाग करायचाय.

यापेक्षा अधिक वेळ देखील लागू शकला असता किंवा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला नसता. सुधाने गोष्ट लिहिली होती, ती सर्वांना आवडली. पाच वर्षांनी का होऊन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नागराज मंजुळे यांनी सैराट, नाळ, झुंड, पिस्तुल्या, फँड्री असे चित्रपट यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे यासर्वच चित्रपटांनी मोठी धमाल केलीये.

Non Stop LIVE Update
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे.