AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: पहिल्या मुलाचं निधन, पत्नीपासून तर कायमचेच..; नाना पाटेकर यांच्या कुटुंबात कोण कोण? गोव्यात राहायचे एकटे

Nana Patekar Family: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

Nana Patekar: पहिल्या मुलाचं निधन, पत्नीपासून तर कायमचेच..; नाना पाटेकर यांच्या कुटुंबात कोण कोण? गोव्यात राहायचे एकटे
| Updated on: Oct 08, 2026 | 12:12 PM
Share

Nana Patekar Family: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, आज सकाळी ५:२० वाजता त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. आता याच दरम्यान नाना पाटेकर यांच्या कुटुंबात कोण कोण राहतात असा प्रश्न चाहत्यांना पडला असावा.

नाना पाटेकर यांच्या कुटुंबात कोण कोण?

नाना पाटेकर यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या वडिलांचे नाव गजानन पाटेकर तर आईचे नाव निर्मला पाटेकर असल्याचे सांगितले जाते. नाना पाटेकर आपल्या पत्नीपासून वेगळे राहत होते. नानांनी १९७८ मध्ये नीलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केले होते, परंतु नंतर ते घटस्फोट न घेता वेगळे झाले. त्यांच्या स्वभावात आणि विचारांमध्ये मोठे मतभेद होते, ज्यामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ही माहिती खुद्द अभिनेत्यानेच दिली होती.

नीलकांती यांनी १९६६ मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे. मराठी अभिनेत्री आणि लेखिका म्हणून स्वतःला स्थापित करण्यापूर्वी त्या एक बँक अधिकारी होत्या. मात्र, अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटातून पुनरागमन करण्यापूर्वी त्या अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या.

पहिला मुलगा दुर्वास याचे निधन झाले आहे. अगदी दोन वर्षांचा असताना त्याचे निधन झाले होते. नाना पाटेकर आणि नीलकांती यांना मल्हार पाटेकर हे दोन मुलगे होते, तर दुर्वासा यांचे वयाच्या दुसऱ्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले. नाना सात भावंडांपैकी एक होते. त्यांच्या पाच भावंडांचे बालपणीच निधन झाले, तर त्यांचे भाऊ अशोक पाटेकर आणि दिलीप पाटेकर अजूनही हयात आहेत. नाना पाटेकर शेवटचे ‘सुभेदार’ या चित्रपटात दिसले होते, जो यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Follow Us
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?