Nana Patekar: नाना पाटेकर यांना मृत्यूची कुणकुण आधीच लागली होती का? अखेरच्या व्हिडिओमध्ये त्यांचे हे शब्द ऐका

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांपूर्वीचे त्यांचे हे शब्द अत्यंत भावनिक ठरत आहेत. हे शब्द ऐकताना अनेकांना नानांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा जाणवतोय.

Nana Patekar: नाना पाटेकर यांना मृत्यूची कुणकुण आधीच लागली होती का? अखेरच्या व्हिडिओमध्ये त्यांचे हे शब्द ऐका
Nana Patekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2026 | 10:20 AM

Nana Patekar: “जायचं आहेच… मी उद्या आहे, नाही… माहीत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक काळ येणारच. पण त्याच्या आधी मला जे करायचंय ते मी करू शकतोय का? मी प्रयत्न केले का?” हे शब्द आहेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील सम्राट क्लब इंटरनॅशनल, पणजी इथं झालेल्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी आयुष्याबद्दल केलेलं हे भाष्य आता चर्चेचा विषय ठरत आहे. कारण कार्यक्रमानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहते भावुक झाले आहेत.

नाना पाटेकर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अभिनयासोबतच आयुष्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही अनेकदा त्यांच्या बोलण्यातून जाणवते. या कार्यक्रमातही त्यांनी मृत्यू अटळ असल्याचं सांगत, माणसाने आयुष्य जगताना स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं. “जायचं आहेच…” या वाक्याने त्यांनी आपल्या विचारांना सुरुवात केली. उद्या आपण असू की नसू, हे कोणालाच माहीत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस असा येणारच, जेव्हा या जगाचा निरोप घ्यावा लागेल. मात्र त्या दिवसापूर्वी आपल्याला जे करायचं आहे, ते आपण खरंच केलं का, याचा विचार महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...

पहा व्हिडीओ-

याचवेळी नाना यांनी केवळ स्वतःपुरतं आयुष्य मर्यादित ठेवण्याबाबतही भाष्य केलं. “माझी मुलं, माझी बायको, माझं घर… याच्यापुरतंच जगायचं असेल…” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माणसाचं आयुष्य केवळ स्वतःभोवती आणि आपल्या कुटुंबाभोवती फिरण्यापेक्षा समाजासाठी, इतरांसाठी आणि आपल्या मनातील ध्येयांसाठीही काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांच्या या वक्तव्यातून मिळते.

विशेष म्हणजे, नाना पाटेकर यांनी हे विचार मांडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यामुळे त्यांच्या या शब्दांना आता वेगळाच भावनिक संदर्भ मिळाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेक चाहते त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

नाना पाटेकर यांचा संपूर्ण प्रवास पाहिला तर संघर्ष, जिद्द आणि स्वतःच्या कलेवर असलेला विश्वास याचं ते उत्तम उदाहरण होते. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला. अभिनयातील वेगळी शैली, प्रभावी संवादफेक आणि व्यक्तिरेखेला दिलेली ताकद यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us