Nana Patekar : नाना पाटेकर यांच्याविरुद्ध हे गुन्हे होते दाखल, आता काय आहे त्यांचं स्टेटस?
Nana Patekar : अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सिनेविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा नाना पाटेकर यांच्या विरोधात अनेक चांगल्या वाईट चर्चा रंगल्या... तर जाणून घ्या नाना पाटेकर यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल होते आणि आता त्यांचं स्टेटस काय आहे.

Nana Patekar : बॉलिवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव जरी घेतलं तरी, त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर येतात आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक होतं. नाना यांनी फक्त सिनेमांमधूनच चाहत्यांचं मनोरंजन केलं नाही तर, ते सामाजिक कार्यात देखील सक्रिय होते. अनेकांच्या मदतीसाठी नाना पाटेकर यांनी पुढाकार घेतला. पण ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आणि प्रकरण पोलीस स्थानक आणि कोर्टापर्यंत देखील पोहोचले. ‘वेलकम’, ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’, ‘वनवास’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘अग्नीसाक्षी’,’यशवंत’, ‘टॅक्सी नं 9211’, यांसारखे एकापेक्षा एक सिनेमे देणारे नाना पाटेकर कायद्याच्या कचाट्यात तेव्हा अडकले जेव्हा अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
भरतात #MeToo आंदोलन सुरु झालं तेव्हा…
2018 मध्ये तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात मोठे आरोप केले. भारतात मीटूची सुरुवात तनुश्री हिनेच केली. तनुश्री हिने आरोप केलेली की, 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमातील एका गाण्याच्या शुटिंग दरम्यान, नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केलं आणि लैगिंक शोषण केल्याचे आरोप केलेले. या आरोपांनंतर, मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी नाना पाटेकर आणि सिनेमा निर्मात्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 509 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला.
पोलिसांची चौकशी आणि ‘बी समरी’ क्लोजर रिपोर्ट
तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या हाय प्रोफाईल केसची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली, जवळपास 1 वर्षांच्या चौकशीनंतर 2019 मध्ये पोलिसांनी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट न्यायालयात या प्रकरणी बी समरी क्लोजर रिपोर्ट दाखल केलं. कायद्यानुसार, जेव्हा आरोपींविरुद्धच्या तक्रारीला पुष्टी देणारा कोणताही ठोस किंवा महत्त्वपूर्ण पुरावा पोलिसांना मिळत नाही, तेव्हा ‘बी-समरी’ (B-summary) अहवाल दाखल केला जातो. रिपोर्टमध्ये पोलिसांनी स्पष्टपणे नमूद केलं की, तपासदरम्यान किंवा सेटवर उपस्थित असलेल्या साक्षीदारांच्या जबाबांतून नाना पाटेकर यांच्याविरुद्ध कोणताही दोष सिद्ध करणारा पुरावा त्यांना आढळला नाही.
तनुश्री दत्ताकडून झालेला विरोध आणि अंतिम निर्णय
पोलिसांच्या ‘क्लोजर रिपोर्ट’शी असहमती दर्शवत, तनुश्री दत्ता हिने न्यायालयात आव्हान दिलं आणि एक विरोध याचिका दाखल केली. हा कायदेशीर लढा न्यायालयात अनेक वर्षे चालला. अखेरीस, मार्च 2025 मध्ये मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण आणि अंतिम निकाल दिला; मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांनी तनुश्री दत्ता हिची विरोध याचिका पूर्णपणे फेटाळून लावली आणि नाना पाटेकर यांच्याविरुद्ध दाखल असलेला फौजदारी खटला कायमस्वरूपी बंद केला.
तब्बल 7 वर्षांनंतर याप्रकरणी नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला… 2025 मध्ये नाना पाटेकर यांनी या प्रकरणी पूर्णपणे क्लीन चीट मिळाली. नाना पाटेकर यांच्या विरोधात ‘मीटू’ संबंधित सर्व तक्रारी कायमसाठी तेथेच संपल्या. पण आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री त्यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त विधान करत आहे.
