AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : आपली साथ देणारा फक्त तोच…मृत्यूबद्दल नाना पाटेकरांनी केलेलं डोळे पाणावणारंं वक्तव्य

Nana Patekar : सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं असून कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका जुन्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मृत्यूबद्दल भाष्य केलेलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Nana Patekar : आपली साथ देणारा फक्त तोच...मृत्यूबद्दल नाना पाटेकरांनी केलेलं डोळे पाणावणारंं वक्तव्य
| Updated on: Oct 08, 2026 | 12:58 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते पहाटे त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीनं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर पहाटे ४ वाजता त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आज, दुपारी ४ वाजता पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय सन्मानानं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शवविच्छेदनानंतर नाना पाटेकर यांना गोव्याहून पुण्यात आणलं जात आहे. अशातच आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक कलाकार, राजकीय नेते नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगत आहेत. एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मृत्यूबद्दल भाष्य केलेलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काय म्हणालेले नाना पाटेकर?

नाना पाटेकर म्हणाले की, ‘तुला माहितीये का तू कधी मारणार आहेस. आपल्याला काहीच माहित नसतं. जन्माला आल्यापासून आई नाही वडील नाही भाऊ नाही, कोणी आपल्यासोबत नसतं. मृत्यू सतत आपल्यासोबत असतो, आता जो आपल्यासोबत आहे, त्याची भीती का वाटावी? साथ फक्त तो देणारा आहे, सतत माझ्यासोबत आहे. नाना चलायचं का? त्याने विचारलं तर म्हणायचं, चला…शाश्वती कशाचीच नाहीये, त्यामुळे ज्याची शाश्वती आहे ते आपण करत नाही.’

‘मला फक्त भीती या गोष्टीची वाटते, माझ्या नकळत मी भ्रष्ट होतोय का? त्यामुळे आपणच आपला आरसा झाल्यानं आयुष्य सोपं होतं.’ असं नाना यांनी शेवटी म्हटलेलं. ‘अमुक तमुक‘ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर बोलत होते.

दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुमारे ४५ मिनिटं नाना पाटेकर यांना सीपीआर (CPR) देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वाचवता आलं नाही. मणिपाल रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी एएनआयला याबद्दल सांगितलं. नाना पाटेकर यांच्या निधनानं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीचा अंत झाला आहे.

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती