Nana Patekar : ‘आ गए मेरी मौत का तमाशा देखने?’, ‘कंट्रोल उदय, कंट्रोल !’ ; नाना पाटेकरांचे हे डायलॉग आजही सुपरहिट
नाना पाटेकर यांचं आज गोव्यात निधन झालं. पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र नाना पाटेकर यांना वाचवता आलं नाही. वैद्यकीय पथकाच्या माहितीनुसार, सकाळी 5:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाना पाटेकर आज आपल्यात नसले तरी त्यांचे संवाद कायम जिवंत राहतील.

काही कलाकारांची ओळख त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या आवाजातून आणि संवादफेकीतून होते. नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्याचे उत्तम उदाहरण होते. पडद्यावर त्यांची एंट्री होताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. त्यांच्या डोळ्यांतील राग, चेहऱ्यावरचे भाव, आवाजातील धार आणि संवाद बोलण्याची अनोखी शैली यामुळे त्यांनी साकारलेली पात्रे प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करायची. आणि आता तोच आवाज कायमचा शांत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज सकाळी नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यांचे काही गाजलेले संवाद, चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील.
गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या निवासस्थानी नाना पाटेकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचवता आले नाही. वैद्यकीय पथकाच्या माहितीनुसार, सकाळी 5:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक चित्रपटांमधील संवाद गाजले, त्यापैकी काही अविस्मरणीय संवादांवर टाकूया नजर
नानांचे गाजलेले संवाद
नाना पाटेकर यांच्या सर्वाधिक गाजलेल्या संवादांपैकी एक म्हणजे ‘क्रांतिवीर’मधील — “तो, आ गए मेरी मौत का तमाशा देखने?” हा केवळ एक संवाद नव्हता. नाना पाटेकर यांनी तो ज्या आवेशाने आणि तीव्रतेने सादर केला, त्यामुळे तो चित्रपटाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला. याच चित्रपटातील आणखी एक संवाद त्यांच्या अभिनयशैलीची झलक देतो — “कुत्ते की तरह जीने की आदत पड़ गई है सबको…” या संवादातून समाजव्यवस्थेवरील संताप, सामान्य माणसाची अस्वस्थता आणि व्यवस्थेविरोधातील आक्रोश स्पष्टपणे जाणवतो.
‘तिरंगा’मधील निर्भीड अंदाज
‘तिरंगा’ चित्रपटातील नाना पाटेकर यांचा संवादही तितकाच लोकप्रिय झाला — “मेरा एक सिद्धांत है, पहले लात फिर बात और इसके बाद ही मुलाकात!” त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास आणि संवादफेकीतील बेधडकपणा या संवादाला विशेष बनवतो. नाना पाटेकर यांच्या अनेक पात्रांमध्ये दिसणारी हीच निर्भीड वृत्ती त्यांच्या अभिनयाची खासियत होती.
‘प्रहार’मध्ये आक्रमक अंदाज
‘प्रहार’ चित्रपटातील त्यांचा एक दमदार संवाद — “तू शेर है, शेर की तरह दहाड़… नहीं वरना कुत्तों की तरह भौंकते रह जाओगे!” या संवादातून नाना पाटेकर यांच्या आवाजातील ताकद आणि अभिनयातील आक्रमकता पुन्हा एकदा जाणवते. ते संवाद केवळ बोलत नसत, तर आपल्या अभिनयातून त्यांना जिवंत करत असत.
‘परिंदा’चा भावनिक संवाद
नाना पाटेकर यांचा अभिनय केवळ राग आणि आक्रमकतेपुरता मर्यादित नव्हता. ‘परिंदा’ चित्रपटातील त्यांचा संवाद — “दुःख नाम की बीमारी का इलाज किसी डॉक्टर के पास नहीं है… इसका इलाज तो इंसान को खुद ही ढूंढना पड़ेगा.”
या संवादातून त्यांच्या अभिनयातील भावनिक बाजूही प्रकर्षाने समोर आली. त्यांच्या संवादांमध्ये केवळ शब्द नसत, तर त्या पात्राची वेदना, संघर्ष आणि भावना असायच्या.
‘यशवंत’मधील ‘एक मच्छर…’ डायलॉग
1996 मध्ये आलेल्या ‘यशवंत’ चित्रपटातील नाना पाटेकर यांचा “एक मच्छर… साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है!” हा संवादही प्रचंड गाजला. या एका संवादातून त्यांनी व्यवस्थेतील असहायता आणि सामान्य माणसाची परिस्थिती प्रभावीपणे मांडली. त्यांच्या संवादफेकीमुळे हा संवादही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.
‘वेलकम’मध्येही गाजली संवादफेक
गंभीर आणि आक्रमक भूमिकांसोबतच नाना पाटेकर यांनी विनोदी भूमिकांमध्येही आपली वेगळी छाप पाडली. ‘वेलकम’ चित्रपटातील उदय शेट्टीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या आवडीची आहे. “भगवान का दिया हुआ सब कुछ है… दौलत है, शोहरत है, इज्जत है…” हा त्यांचा संवाद आणि त्यानंतरचा “कंट्रोल, उदय, कंट्रोल!” हा डायलॉग आजही तितकाच लोकप्रिय आहे.
नाना पाटेकर यांचे हे संवाद केवळ चित्रपटातील वाक्ये नव्हती. त्यांच्या आवाजातील वजन, चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यांतील तीव्रता आणि संवादफेकीची अनोखी शैली यामुळे प्रत्येक संवादाला एक वेगळी ओळख मिळाली.