अजितचं भाषण ऐकताना मला…जेव्हा नाना पाटेकरांनी अजितदादांचं तोंडभरून कौतुक केलं होतं; अजरामर नात्याचा अजरामर किस्सा!

नाना पाटेकर आणि अजित पवार 2016 साली एकदा एकाच मंचावर आले होते. अजितदादांच्या हस्ते नाना पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी नाना पाटेकर यांनी अजितदादांचे तोंडभरून कौतुक केले होते.

अजितचं भाषण ऐकताना मला...जेव्हा नाना पाटेकरांनी अजितदादांचं तोंडभरून कौतुक केलं होतं; अजरामर नात्याचा अजरामर किस्सा!
ajit pawar and nana patekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 1:43 PM

Nana Patekar passed away : आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेक्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांचं आज दुख:द निधन झालं. त्यांच्या दुर्दैवी जाण्यामुळे संपूर्ण बॉलिवुडमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. नाना पटेकर हे चांगले वक्त होते. अभिनयाबाबत तर त्यांच्या तोडीचा अभिनेता अजूनही झालेला नाही. राजकीय नेत्यांसोबत त्यांचा चांगला संपर्क होता. महाराष्ट्रतील राजकीय वर्तुळातील अनेक बडे नेते नाना पाटेकर यांच्याकडे आदराने पाहायचे. दिवंगत नेते अजित पवार यांच्यासोबतही नाना पाटेकर यांचे सौहार्दाचे संबंध होते. अनेकदा ते वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र आलेले आहेत. दरम्यान, आज नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांनी अजितदादांच्या केलेल्या कौतुकाची चर्चा होतेय. नाना पाटेकर यांनी माध्यमांशी बोलताना तसेच भाषणातही अजित पवार यांचे तौंडभरून कौतुक केले होते.

अजित पवार खूप काम करतात

नाना पाटेकर यांनी 2022 साली एकदा माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य केलं होतं. अजितदादा प्रचंड मेहनती आहेत, असं नाना पाटेकर म्हणाले होते. ‘अजित पवार खूप काम करतात. ते खूप काम करत असले तरीही त्याची जाहिरात कधीच करत नाहीत,’ अशा भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच अजितदादा यांच्या तोंडून अनावधानाने निघालेल्या एखाद्या शब्दाचा एवढा मुद्दा केला जातो. परंतु त्यांनी केलेली कामेही दाखवत राहिली पाहिजेत, असा सल्ला नाना पाटेकर यांनी दिला होता.

Loading...

अशा थोर व्यक्तीच्या हातून माझा सन्मान…

नाना पाटेकर आणि अजित पवार 2016 साली एकदा एकाच मंचावर आले होते. अजितदादांच्या हस्ते नाना पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान ‘अजित ओघवतं बोलतात. त्यांचा शब्दसमुच्चय वाढला आहे. कुठले शब्द नेमके कुठे वापरायचे आहे, हे त्यांना चांगलं समजायला लागलंय. अजित पवार यांचे वाचनही आहे. अजित पवार यांची विद्वत्ताप्रचूर भाषणं ऐकताना गहिवरल्यासारखं होतं. अशा थोर व्यक्तीच्या हातून माझा सन्मान होत असल्याने मला छान वाटतंय,’ असं बोलत नाना पाटेकर यांनी अजितदादा यांचं कौतुक केलं होतं. दरम्यान, आज या दोन्ही दिग्गज व्यक्ती आपल्यात नाहीत. त्यांचं नातं, त्यांचं कार्यकर्तृत्त्व कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या जातायत.

पाहा व्हिडीओ :

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us