नाना पाटेकर होते निस्सीम देशभक्त, कारगिल युद्ध लढलेले, थेट संरक्षण मंत्र्यांकडेच मागितलेली परवानगी, काय घडलेलं?

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज दुर्दैवी निधन झालं. त्यांनी ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत असून चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. दरम्यान, यावेळी नानांच्या विविधांगी पैलूंची चर्चा होत आहे.

नाना पाटेकर होते निस्सीम देशभक्त, कारगिल युद्ध लढलेले, थेट संरक्षण मंत्र्यांकडेच मागितलेली परवानगी, काय घडलेलं?
Nana patekar news
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 5:03 PM

नाना पाटेकर हे केवळ उत्कृष्ट अभिनेते नव्हते तर ते एक जबाबदार नागरिकही होते. त्यांनी नेहमी देशाच्या हिताचा विचार केला आणि त्यासाठी प्रत्यक्ष योगदानही दिले. पडद्यावर त्यांनी अनेक प्रसिद्ध आणि अजरामर भूमिका साकारल्या पण तुम्हाला माहिती आहे का, की त्यांनी भारताच्या लष्करातही सेवा दिली आहे. होय, त्यांनी भारतीय प्रादेशिक सेनेमध्ये सेवा केली आहे. एवढच नाही तर ते कारगिल युद्धाचाही एक भाग राहिले आहेत. याबद्दलचा खुलासा स्वतः नाना पाटेकरांनीच केला होता.

नाना पाटेकरांनी कारगिल युद्धावेळी काही काळ अभिनय क्षेत्रातूनन ब्रेक घेतला होता. त्यानंतर ते लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांनी द लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबद्दल सर्व माहिती दिली होती. नाना म्हणालेले की, “त्यावेळी फर्नांडिस साहेब संरक्षण मंत्री होते. आणि मला युद्धामध्ये सहभागी व्हायचे होते. मी माझी कमांडोे म्हणून ट्रेनिंग पूर्ण केली होती. मी चांगला नेमबाज आहे. मी राष्ट्रीय स्तरावर खेळलो आहे. मला पदकही मिळाले आहे.”

Loading...

पुढे बोलताना त्यांनी सांगितलेलं की, कारगिल युद्धाच्या काळात आम्हाला तिथे फोन आला, आम्ही युद्धात सहभागी होण्याची भूमिका घेतली. पण त्यावेळी आम्हाला सांगण्यात आले की तुम्ही नागरिक आहात. त्यामुळे तुम्हाला यामध्ये सहभाग घेता येणार नाही. पण मला फर्नांडिस साहेब चांगलं ओळखत होते. त्यांनी मला विचारलं, की कधी जायचं आहे. मी सांगितलं तत्काळ. त्यानंतर मी युद्धात गेलो. मी क्विक रिअॅक्शन टीमचा सदस्य झालो. आपण देशासाठी एवढ तरी करुच शकतो. आपले सर्वात मोठे शस्त्र हे बोफोर्स किंवा एके ४७ नसून आपले सैनिक आहेत, असं नानांनी स्पष्ट केलं होतं.

त्यापुढे बोलताना नानांनी सांगितलेलं की, जेव्हा मी कारगिल युद्धात सामिल झालो तेव्हा माझं वजन ७६ किलो होतं मी जेव्हा परत आलो तेव्हा माझं वजन ५६ किलो होतं. दोन महिन्यांमध्ये माझ्या तब्येतीत प्रचंड फरक पडला होता. मला आनंद आहे की मी देशासाठी एवढं तरी करु शकलो, असं नानांनी सांगितलं होतं. दरम्यान, आज सकाळी ५.२० मिनिटांनी नाना पाटेकरांची प्राणज्योत मावळली आहे. ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील घरी त्यांनी हृदयविकाराच्या धक्का आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल केले गेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us