AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकरांचा मुलगा साधा, गुडलुकिंग, पण टॅलेंटमध्ये वडिलांपेक्षा चार पाऊल पुढे, फोटो पाहून म्हणाल…

Nana Patekar : नाना पाटेकर यांचा मुलगा लाईमलाईटमध्ये नसतो, पण आहे वडिलांपेक्षा अधिक टॅलेंटेड... नाना पाटेकर यांचा मुलगा करतो तरी काय? त्याला पाहून म्हणाल...; सध्या सर्वत्र नाना पाटेकर आणि त्यांच्या मुलाची चर्चा... पाटेकरांचा मुलगा अभिनेता नसून...

नाना पाटेकरांचा मुलगा साधा, गुडलुकिंग, पण टॅलेंटमध्ये वडिलांपेक्षा चार पाऊल पुढे, फोटो पाहून म्हणाल...
| Updated on: Nov 12, 2023 | 9:12 AM
Share

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी, मराठी सिनेविश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आजही नाना पाटेकर यांनी इंडस्ट्रीमध्ये कोणी घेऊ शकलं नाही. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. नाना पाटेकर यांना अनेकवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नानांच्या नावावर पद्मश्री पुरस्कारही आहे. नाना पाटेकर यांचं अभिनय, त्यांचे डायलॉग बोलण्याची शैली इत्यादी गोष्टींमुळे नाना पाटेकर चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. म्हणून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नाना पाटेकर यांचा चाहता आहे.

नाना पाटेकर फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. नाना पाटेकर यांचं लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झालं. दोघांना एक मुलगा देखील आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे.

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर लाईमलाईटपासून दूर अत्यंत साधं आयुष्य जगतो. मल्हार याने मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण घेतलं मल्हार याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. मल्हारला लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची आवड होत. पण मल्हार याचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं..

मल्हार दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमाच्या माध्यमातून सिनेविश्वात पदार्पण करणार होता. पण नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यात वाद झाल्यानंतर नाना यांनी मल्हार याला सिनेमात काम करण्यास नकार दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांची चर्चा रंगली आहे.

प्रकाश झा यांच्या सिनेमात वडिलांनी काम करण्यास नकार दिल्यानंतर मल्हार याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक ऑफ 26\11’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आता मल्हार पाटेकर याचं स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. मल्हार पाटेकर याने वडिलांच्या नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं आहे.

मल्हार पाटेकर याच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस असं आहे. मल्हार याचं राहणीमान साधं असलं तरी, तो गुडलुकिंग आहे. सोशल मीडियावर नाना पाटेकर आणि मल्हार पाटेकर यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?