तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण..; नाना पाटेकरांच्या भविष्यातील प्लॅनिंगबद्दल मुलगा मल्हारचा खुलासा

Malhar Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मल्हार पाटेकरने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. नाम फाऊंडेशन आणि निर्मला गजानन फाऊंडेशन या संस्थांच्या पुढील कार्यबद्दल नानांनी आधीच प्लॅनिंग केली होती, असं तो म्हणाला.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण..; नाना पाटेकरांच्या भविष्यातील प्लॅनिंगबद्दल मुलगा मल्हारचा खुलासा
Nana Patekar and Malhar Patekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2026 | 2:49 PM

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यातूनही स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर आता मुलगा मल्हार पाटेकर याने वडिलांच्या सामाजिक कार्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. नाना पाटेकर यांनी त्यांच्या दोन्ही संस्थांमधील जबाबदाऱ्या आधीच पुढच्या पिढीकडे सोपवल्या होत्या. त्यांच्या या निर्णयामागे एक वेगळीच विचारसरणी होती. वडिलांच्या आठवणी सांगताना मल्हार भावूक झाला असून, त्याचे शब्द अनेकांच्या मनाला स्पर्श करणारे आहेत.

नाना पाटेकरांनी आधीच पुढच्या पिढीकडे सोपवली होती जबाबदारी

नाना पाटेकर यांनी केवळ चित्रपटांमधून मनोरंजन केलं नाही, तर सामाजिक प्रश्नांवर काम करत अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला. नाम फाऊंडेशन आणि निर्मला गजानन फाऊंडेशन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी योगदान दिलं. त्यांच्या निधनानंतर मुलगा मल्हार पाटेकर याने सांगितलं की, नानांनी या दोन्ही संस्थांमधील जबाबदाऱ्या आधीच पुढच्या पिढीकडे सोपवल्या होत्या. मल्हारच्या म्हणण्यानुसार, नानांनी उभारलेले सर्वकाही पुढच्या पिढीकडे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना स्वतःकडे जबाबदाऱ्या ठेवून घ्यायच्या नव्हत्या. उलट, इतरांकडे काम सोपवून दुसरीकडे जाऊन पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याची त्यांची इच्छा होती.

Loading...

वडिलांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलताना मल्हारने एक भावनिक आवाहन केलं. नाना पाटेकर यांनी सुरू केलेलं काम थांबू नये, तर ते पुढेही सुरू राहावं, अशी त्याची इच्छा आहे. या प्रयत्नांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहनही त्याने केलं. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या प्रश्नांवर काम करण्यात आलं आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे नाना पाटेकर यांची ओळख केवळ अभिनेता म्हणून मर्यादित राहिली नाही. समाजातील गरजू घटकांसाठी काम करणारी व्यक्ती म्हणूनही त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला जातो.

वडिलांच्या आठवणी सांगताना मल्हार पाटेकर भावूक झाला. नाना पाटेकर हे त्याच्यासाठी नेहमीच ‘नानासाहेब’ राहतील, असं त्याने सांगितलं. नानासाहेब आता या जगात नाहीत, हे स्वीकारलं तर स्वतःचं अस्तित्वच संपल्यासारखं होईल, अशी भावना त्याने व्यक्त केली. मल्हारच्या या शब्दांत वडिलांविषयी असलेलं प्रेम आणि त्यांच्याशी जोडलेले भावनिक नातं स्पष्टपणे दिसून येतं. त्याच्यासाठी नानासाहेब हे केवळ वडील नव्हते, तर त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us