AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: कोणाला कळू न देता नाना पाटेकर याठिकाणी फिरायला जायचे; सोनाली कुलकर्णीचा खुलासा

Nana Patekar: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नाना पाटेकरांचे अनेकांना माहीत नसलेले पैलू सांगितले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती नानांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Nana Patekar: कोणाला कळू न देता नाना पाटेकर याठिकाणी फिरायला जायचे; सोनाली कुलकर्णीचा खुलासा
Nana Patekar and Sonali KulkarniImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 11, 2026 | 11:03 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी आणि माहीत नसलेले पैलू समोर येत आहेत. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारे नाना प्रत्यक्ष आयुष्यात किती वेगळे होते, याचा खुलासा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केला आहे. नानांना परदेशात फिरण्याची प्रचंड आवड होती. ते कोणालाही न सांगता गुपचूप युरोपच्या ट्रिपला जायचे, अमेरिकेत जाऊन अनेक दिवस फिरून यायचे. इतकंच नाही, तर जवानांना भेटण्यापासून ते महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक मदत करण्यापर्यंत अनेक गोष्टी ते प्रसिद्धीपासून दूर राहून करायचे. सोनाली कुलकर्णीने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत नानांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक पैलू उलगडले आहेत.

कोणालाही न कळू देता युरोप-अमेरिकेच्या ट्रिपला जायचे नाना

नाना पाटेकर यांना प्रवासाची प्रचंड आवड होती. विशेष म्हणजे, ते आपल्या परदेश दौऱ्यांचा फारसा गाजावाजा करत नसत. कोणाला काहीही कळू न देता ते गुपचूप युरोपला जायचे. अमेरिकेतही ते अनेक दिवस फिरून यायचे. नानांनी परदेशात फिरायला कधीपासून सुरुवात केली, याची आपल्याला माहिती नसल्याचं सोनाली कुलकर्णीने सांगितलं. नानांच्या व्यक्तिमत्त्वातील हा पैलू अनेकांना माहीत नसेल. पडद्यावर गंभीर आणि आक्रमक भूमिका साकारणारे नाना प्रत्यक्ष आयुष्यात स्वतःच्या आवडीनिवडी जपणारे होते. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून प्रवासाचा आनंद घेणं त्यांना आवडायचं.

जवानांना भेटायला जायचे

नाना पाटेकर यांचं भारतीय जवानांशीही विशेष नातं होतं. ते जवानांना भेटण्यासाठी वारंवार जायचे. या भेटींच्या आठवणी जपताना त्यांना मिळालेल्या एका भेटवस्तूचाही सोनालीने उल्लेख केला. नानांना सैन्याकडून एक कप भेट मिळाला होता. अनेक वर्षांपूर्वी नानांनी तो कप सोनाली कुलकर्णीला दिला होता.

महाराष्ट्रातील खेळाडूंना केली लाखमोलाची मदत

नाना पाटेकर यांना स्वतःला नेमबाजीची प्रचंड आवड होती. त्यामुळे महाराष्ट्रातील नेमबाजांना मदत करण्यासाठीही ते पुढे असायचे. सातारा, कोल्हापूर आणि राज्यातील अनेक गावांमधील खेळाडूंना त्यांनी मदतीचा हात दिला. नेमबाजीसाठी आवश्यक असलेल्या शूटिंग रेंज उभारण्यापासून ते खेळाडूंना शूटिंग इक्विपमेंट उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी सढळ हाताने मदत केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावणाऱ्या तेजस्विनी सावंतसारख्या खेळाडूंनाही त्यांच्या मदतीचा फायदा झाला. विशेष म्हणजे, या मदतीचा त्यांनी कधीही मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला नाही. अनेकांना त्यांच्या या योगदानाची माहितीही नाही. प्रसिद्धीपेक्षा खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात, हीच त्यामागची भावना होती.

Follow Us
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर