AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patrkar | शेती करतात, साधं आयुष्य जगतात, पण कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत नाना पाटेकर

Nana Patrkar | मुंबईत नाना पाटेकर यांचं भव्य घर, महागड्या गाड्या... एका सिनेमासाठी इतक्या कोटींचं मानधन घेतात नाना पाटेकर? सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या संपत्तीची चर्चा... कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत नाना पाटेकर

Nana Patrkar | शेती करतात, साधं आयुष्य जगतात, पण कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत नाना पाटेकर
| Updated on: Aug 19, 2023 | 9:12 AM
Share

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : अभिनेते नाना पाटेकर यांनी फक्त मराठी सिनेविश्वात नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता देखील चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. गेल्या ४ दशकांपासून नाना पाटेकर झगमगत्या विश्वात सक्रिय आहेत. नाना पाटेकर फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयु्ष्यामुळे देखील चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना नाना पाटेकर यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं… पण कोणासोबत देखील नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण आता नाना पाटेकर त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आले आहेत.

चाहत्यांना नाना पाटेकर यांची एक आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा साधेपणा.. सिनेविश्वातील मोठे स्टार असले तरी, नाना पाटेकर लाइमलाइट पासून दूर असतात. याशिवाय दानधर्म कार्यातही ते पूर्ण सहकार्य करतात. नाना पाटेकर शेती करतात. साधं आयुष्य जगतात… पण त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. तर आज जाणून घेवू नाना पाटेकर यांच्याकडे किती कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते त्यांच्या देसी अंदाजाने चाहत्यांना प्रभावित करतात. त्याचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात ते शेती करताना दिसले. नाना पाटेकर यांचा स्वभाव देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो… नाना यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं मुंईत भव्य घर आहे.

नाना यांच्या मुंबईत असलेल्या घाराची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. नाना पाटेकर यांच्याकडे महिंद्रा जीप CJ4, ऑडी Q7 आणि महिंद्रा स्कॉर्पियो देखील आहे. गडगंज संपत्ती असूनही नाना पाटेकर यांना अतिशय साधं जीवन जगायला आवडतं..

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ते ५५ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत… अशी चर्चा रंगत आहे. तर नाना पाटेकर एक सिनेमासाठी २-३ कोटी रुपये मानधन घेतात. तर एका जाहिरातीसाठी नाना पाटेककर १ कोटी रुपये मानधन घेतात. एवढंच नाही तर, सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये देखील नाना पाटेकर यांचा वाटा असतो..

नाना पाटेकर यांचं महिन्याला उत्पन्न जवळपास ५० लाख रुपये आहे. तर वर्षाला नाना पाटेकर ६ कोटी रुपये कमावतात असं देखील सांगण्यात येत आहे. नाना पाटेकर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, आता नाना पाटेकर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात दिसणार आहे. सिनेमा सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.