AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाह यांचं पत्नीच्या धर्मांतरावरून मोठं वक्तव्य; म्हणाले ‘लव्ह-जिहादचा आरोप..’

विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरून मोकळेपणे मतं मांडणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नुकतंच खुलं पत्र लिहित लव्ह-जिहादच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. रत्ना पाठक यांना कधीच इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाह यांचं पत्नीच्या धर्मांतरावरून मोठं वक्तव्य; म्हणाले 'लव्ह-जिहादचा आरोप..'
Naseeruddin Shah and Ratna PathakImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2023 | 3:25 PM
Share

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी ‘लव्ह-जिहाद’ या विषयावरून खुलं पत्र लिहिलं आहे. या खुल्या पत्रात त्यांनी पत्नी रत्ना पाठक शाह यांच्या धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की लग्नानंतर त्यांच्यावर लव्ह-जिहादचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नव्हे तर सध्याच्या काळात आपल्या देशात धर्म हा राजकीय मुद्दा बनला आहे असं ते म्हणाले. मात्र माझ्या आईने कधीच रत्नाला तिचा धर्म बदलण्यास सांगितला नव्हता, असं नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्ट केलं.

“मला त्या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप नाही”

नसीरुद्दीन शाह यांनी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रात खुलं पत्र लिहित लग्नाविषयी सांगितलं. “मला कधीच हिंदू मुलीशी लग्न करण्यात काही समस्या नव्हती आणि रत्नालाही मुस्लीम मुलाशी लग्न करण्यात समस्या नव्हती. माझ्या मनात रत्नाशी लग्न करण्याबाबत कधीच शंका उपस्थित झाली नव्हती. मला त्या निर्णयाचा कधीच पश्चात्तापसुद्धा झाला नाही. मी कधीच असा विचार केला नव्हता की माझ्या लग्नावर एका माजी कॅबिनेट मंत्रीचा पती प्रश्न उपस्थित करेल. मला धमकी देण्यात आली होती. माझ्या लव्ह-जिहादचा आरोप करण्यात आला आणि त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झालं की त्यांना म्हणायचंय, आता माझी वेळ झाली आहे”, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

रत्ना पाठक यांच्याशी लग्नाबाबत आईची प्रतिक्रिया

याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, “रत्नाशी लग्न करण्याबद्दलचा निर्णय मी जेव्हा माझ्या घरी सांगितला तेव्हा आईने फक्त एकदाच विचारलं होतं की ती इस्लाम धर्म स्वीकारणार का? मी नकार देताच आई म्हणाली, “होय, धर्म कसा बदलला जाऊ शकतो?” माझ्या आणि रत्नाच्या कुटुंबीयांनीही आमच्या नात्याला स्वीकारलं. माझी आणि रत्नाची साथ या गोष्टीचा पुरावा आहे की हिंदू आणि मुस्लीम सोबत राहू शकतात. तर मग आमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणार ते कोण? हे विष आलं कुठून, असा माझा प्रश्न आहे. फाळणीदरम्यान रुजवलेल्या बियांचे अंकुर हळूहळू आता फुटतायत.”

नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे 1975 मध्ये सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से संन्यास तक’ या नाटकाच्या तालमीदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1982 मध्ये लग्न केलं. 2020 मध्ये सुषमा स्वराज यांचे पती आणि मिझोरमचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या लग्नावरून प्रश्न उपस्थित केला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.