AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा बागेश्वर यांच्या चरणी सेलिब्रिटीही नतमस्तक; नाटू-नाटूचे गायक, ‘गदर २’ची अभिनेत्रीही पोहोचली दर्शनाला

बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रामाला देखील अनेक भक्तांची गर्दी जमते. आता नाटू-नाटूचे गायक, 'गदर २'ची अभिनेत्रीही बागेश्वर बाबा यांच्या चरणी नतमस्तक, अभिनेत्री आईसोबत नेहमी जाते बाबांच्या दर्शनाला...

बाबा बागेश्वर यांच्या चरणी सेलिब्रिटीही नतमस्तक; नाटू-नाटूचे गायक, 'गदर २'ची अभिनेत्रीही पोहोचली दर्शनाला
baba bageshwar
| Updated on: Mar 20, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Dham) यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेली आहे. बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रामाला देखील अनेक भक्तांची गर्दी जमते. बाबा बागेश्वर यांच्या चरणी फक्त सर्वसामान्य जणताचं नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील नतमस्तक होतात. बाबा बागेश्वर यांचं दिव्य दर्शन संपल्यानंतर देखील त्यांचं दर्शन घेण्यासाठी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रिटी प्रतीक्षा करत असतात. अनेक सलेब्रिटी देखील बाबा बागेश्वर यांचं दर्शक घेण्यासाठी इच्छुक असतात. यामध्ये अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमातील अभिनेत्री सिमरत कौर आणि नाटू-नाटू गाण्याचे गायक विशाल मिश्रा यांसारखे सेलिब्रिटी देखील आहेत. विशाल मिश्रा यांनी नाटू-नाटू गाण्याचं हिंदी व्हरर्जन गायलं आहे.

‘टीवी9 भारतवर्ष’ला अभिनेत्री सिमरत कौर हिने सांगितलं की, बाबा बागेश्वर यांची शालीनता अभिनेत्रीला आवडली आहे. बागेश्वर बाबा ज्या पद्धतीने सामान्य लोकांशी मातृभाषेत संवाद साधतात, ते फार चांगलं आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, बागेश्वर बाबा यांच्यामध्ये काही गोष्टी आशा आहेत, ज्यांसोबत मी जोडली गेली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री सिमरत कौर हिची चर्चा आहे.

अभिनेत्री सिमरत कौर हिची आई देखील बागेश्वर बाबा यांची मोठी भक्त आहे. बाबा बागेश्वर यांच्या दर्शनासाठी अभिनेत्री कायम आईसोबत पोहोचते. अभिनेत्रीची आई गेल्या अनेक दिवसांपासून बाबा बागेश्वर यांची भक्त आहे. सिमरत कौर ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सांगायचं झालं तर, ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सिमरत कौर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पूर्ण २१ वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

‘गदर २’ सिनेमाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमासाठी मी उत्साहित आहे…’ याआधी सिमरत कौर हिने साऊथ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘गदर’ सिनेमाला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. म्हणून ‘गदर २ प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल की नाही, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

‘गदर २’ चाहत्यांना पुन्हा अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीशा पटेल यांची जोडी मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल शर्मा यांच्या खांद्यावर आहे. गदरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात दोखील आयकॉनिक सीन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. एवढंच नाही तर, सिनेमात “उड जा काले कावा” हे गाणं देखील असणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.