अमरीश पुरी यांच्या निधनानंतर Gadar 2 मध्ये सनी देओल याच्यासोबत कोण भांडणार; सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी पाहा चेहरा !

Gadar: Ek Prem Katha सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर; सिनेमात अमरीश पुरी यांची भूमिका कोण साकारणार? पाहा सिनेमात कोण दिसणार खलनायकाच्या भूमिकेत?

अमरीश पुरी यांच्या निधनानंतर Gadar 2 मध्ये सनी देओल याच्यासोबत कोण भांडणार; सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी पाहा चेहरा !
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 12:11 PM

Gadar: Ek Prem Katha : सध्या सर्वत्र अभिनेता सनी देओल (sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) यांच्या ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘गदर’ (gadar) सिनेमा तुफान गाजल्यानंतर चाहते सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतीक्षेत होते. सिनेमात सनी देओल याने तारा सिंग या भूमिकेला न्याय दिला होता, तर अमिषा हिने सकिनाच्या भूमिकेत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता लवकरच ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गदर २’ मध्ये सनी आणि अमिषा त्यांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेते अमरीश पुरी (amrish puri) यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. पण आता पुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेला कोण न्याय देईल याची चर्चा तुफान रंगत आहे.

सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार अमरीश पुरी यांची भूमिका अभिनेते रोहित चौधरी साकारणार असं कळत होतं. पण आता सिनेमाबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. सिनेमात अमरीश यांची भूमिका रोहित चौधरी नाही तर अभिनेते मनीष वाधवा साकारताना दिसणार आहेत. एका मुलाखतीत रोहित चौधरी यांनी मोठा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सिनेमात रोहित चौधरी दुसऱ्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गदर सिनेमाच्या रोज नवीन अपडेट समोर येत आहेत, तर दुसरीकडे सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात अमरीश पुरी यांच्या जागी मनीष वाधवा यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. (amrish puri hollywood movie)

‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल शर्मा यांच्या खांद्यावर आहे. गदरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात दोखील आयकॉनिक सीन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. एवढंच नाही तर, सिनेमात “उड जा काले कावा” हे गाणं देखील असणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे.

अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आजही सिनेमाचे डायलॉग आणि गाणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आजही ‘गदर’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान प्रेक्षक ‘गरद २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ सिनेमाच्या चर्चा आता रंगत आहेत.

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….