
Navya Nanda-Sara Ali Khan Collaboration: महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी मिळून महिलांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. सांगायचं झालं तर, नव्या नंदा आणि सम्यक चक्रवर्ती यांनी ‘निमाया’चा पाया रचला आहे. अभिनेत्री सारा अली खान हिला त्यांच्या फाउंडेशनची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आलं आहे. तरुण महिलांना आर्थिकदृष्ट्या, भावनिक आणि सोशली सशक्त घडवण्यासाठी ‘निमाया’ची सुरुवात करण्यात आली आहे.
नव्या हिने ‘निमाया’ बद्दल सांगितलं की, ‘सम्यक आणि निमाया एकत्र काम करत आहे. ज्याचा संस्कृतमधून अर्थ ‘संधी’ असा आहे आणि मला असं वाटतं आम्ही तेच करत आहोत… सम्यक यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे आणि मी तरुणींसोबत खूप जवळून काम करत होती.
आम्ही कार्यक्रम तयार करण्यासाठी आमची आवड आणि कौशल्याचा वापर केला. ज्यामुळे अडथळ्यांना तोंड देणाऱ्या तरुण महिलांना त्यांच्यावर मात करण्याची संधी मिळेल.’ असं देखील नव्या नवेली म्हणाली.
सम्यक चक्रवर्ती याआधी म्हणाला होता की, त्यांचा नवा प्रोजेक्ट ॲनिमियाबाबत जनजागृती निर्माण करण्यास मदत करेल. ‘या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही आता जवळपास 15 दशलक्ष इंप्रेशनवर पोहोचलो आहोत. ‘निमाया’ हा महिलांना सामर्थ्यवान बनविण्याविषयी आहे आणि आम्ही सशक्त स्त्रिया तयार करत आहोत.
नवीन नंदा आणि सम्यक चक्रवर्ती यांनी सारा अली खानला ‘निमाया’ची ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं आहे. म्हणजेच महिलांचे आरोग्य, अशक्तपणा आणि त्यांच्या कौशल्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सारा या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.