लग्नासाठी मुलांना व्हर्जिन मुलगीच.., बुरसटलेल्या विचारांवर नीना गुप्ता यांचा प्रहार

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता कायम त्यांच्या स्पष्ट मतांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी बुरसटलेल्या विचारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलांना लग्नासाठी व्हर्जिन मुलगीच लागते आणि अन्य गोष्टींवर देखील त्यांनी स्वतःचे मत स्पष्ट केले आहेत.

लग्नासाठी मुलांना व्हर्जिन मुलगीच.., बुरसटलेल्या विचारांवर नीना गुप्ता यांचा प्रहार
Neena Gupta
| Updated on: Feb 17, 2026 | 3:18 PM

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता कायम समाजातील वास्तव सांगत प्रहार करत असतात. त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये त्या प्रत्येक मुद्द्यावर अतिशय धाडसीपणे स्वतःचं मत व्यक्त करताना दिसतात. आता पुन्हा नीना गुप्ता यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. ज्यामुळे नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय पुरुषांना लग्नासाठी फक्त व्हर्जिन मुलीच लागतात… तर सुना डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांचे आशीर्वाद घेतात.
नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, ‘मुलांना लग्नासाठी फक्त व्हर्जिन मुलीच लागतात. पुरुष लग्न करताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात… मुलांना फक्त अशा मुली हव्या असतात, ज्या कुटुंबात मिसळून राहतील… हे पूर्वीपासून चालत आलं आहे… त्यामध्ये आज देखील कोणते बदल झालेले नही..

यावर मुलखत घेणारा व्यक्ती म्हणाला, पण आता तर अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. यावर नीना गुप्ता म्हणाल्या, ‘कुठे आणि काय – काय बदललं आहे… कोण म्हणतं सर्व काही बदललं आहे? तुम्ही भारताबद्दल बोलत आहात ना… आमच्या येथे तर अद्यापही काही बदलेलं नाही.. सुना आज देखली डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात…’

‘मी आता मुलाखत देत आहे म्हणून हे सर्व काही बोलतये असं नाहीये… माझ्या वडिलांच्या बाजूची एक मुलगी आहे. तिचं लग्न मुंबईतील एक मुलासोबत झालं… मुलीने जेव्हा सासरी राहण्यास नकार दिला तेव्हा माझ्या वडिलांना बोलवलं होतं. तेव्हा कळलं की, मुलगी साई बाबा यांची पूजा करते आणि सासरच्या लोकांची इच्छा होती की, मुलीने त्यांच्या गुरुची पूजा करायला हवी… एवढंच नाही तर, माझ्या भाचीची सासू अजूनही बेडसाईड टेबलवर कुटुंबाचे फोटो ठेवू देत नाही. आपल्याला अजूनही खूप काही बदलायचं आहे.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.

नीना गुप्ता यांनी देखील खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे.   नीना गुप्ता यांना 1989 मध्ये जेव्हा समजलं की त्या गरोदर आहेत, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. परंतु त्यांना या गोष्टीचीही जाणीव होती की यापुढील त्यांचा प्रवास काही सोपा नसणार. कारण त्या काळात नीना गुप्ता लग्नाआधी गरोदर राहिल्या होत्या.  इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता गरोदर राहिल्या होत्या