‘म्हातारपणातही रोमान्सची इच्छा होते कारण सेक्स फक्त’, नीना गुप्तांचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 50 वर्षांनंतरच्या प्रेमावर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या मते, प्रेम फक्त शारीरिक आकर्षण नाही तर एक सुंदर भावना आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांचे उदाहरण देऊन प्रौढ वयातील आत्मप्रेमावर आणि रोमान्सवर भर दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा आणि अभिनयासोबतच त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे तेवढ्याच चर्चेत असतात. त्या कोणत्याहा विषयावर अगदी स्पष्ट मत मांडतात. तसेच त्यांच्यासाठी वय म्हणजे ‘जस्ट नंबर’ अशी भावना आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या कपड्यांमुळे किंवा त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ट्रोलही केलं जातं. आता त्यांचं असच एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नीना गुप्ता सध्या अनुपम खेर यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘मेट्रो…इन दिनो’ या चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटात अनेक कथा एकत्र केल्या आहेत, ज्यामध्ये नीना आणि अनुपम एका वृद्ध जोडप्याची भूमिका साकारत आहेत, जे पडद्यावर प्रौढ वयातील प्रेमाचे सौंदर्य दाखवतात.
50 वर्षांनंतरच्या प्रेम अन् रोमान्सबद्दल नीना यांचे विचार
एका मुलाखतीत, नीना गुप्ता यांनी 50 वर्षांनंतरच्या प्रेमाबद्दलचे त्यांचे विचार मांडले. त्या म्हणाल्या की, “मी सहमत आहे, मला अजूनही रोमँटिक वाटते. प्रेम म्हणजे फक्त सेक्स किंवा आकर्षण नाही. ते चांगले वाटण्याबद्दल आहे.चांगले वाटणे अनेक स्वरूपात येते. जसं की मी माझ्या कपड्यांच्याबाबत फार प्रेम करते. मी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे घालते तेव्हा मला खूप छान वाटते. पूर्वीच्या काळात मी कधीही बिकिनी घालत नव्हते. मी ज्या घरातील वातावरणातून दिल्लीतून आले होते, तिथे अशी संस्कृती नव्हती. पण जेव्हा मी मुंबईत राहायला गेले आणि एकटी राहायला लागले तेव्हा मी माझ्या बाथरूममध्ये बिकिनी घालायचे. आरशासमोर उभी राहायचे आणि तेव्हा मला फार छान वाटायचं. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. ते देखील प्रेम आहे. स्वत:वर प्रेम करणे ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे चांगले वाटण्यासाठी वयाची मर्यादा नसते.”
View this post on Instagram
अनुराग बसूंचे कौतुक
नीना गुप्ता यांनी दिग्दर्शक अनुराग बसू यांचे कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली, ‘मला माहितही नव्हते की तो मला काही ऑफर करेल. पण जेव्हा त्याने भूमिकेसाठी मला विचारलं तेव्हा मी त्याला पहिल्यांदा हेच सांगितलं की “माझी भूमिका काय आहे ते मला सांगू नका, मी ती करेन. मला त्याच्यासोबत काम करायचं होतं, विशेषतः ‘लाईफ इन अ… मेट्रो नंतर.’ ‘ मेट्रो…इन दिनो’ मध्ये नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, सारा अली खान आणि फातिमा सना शेख यांच्या भूमिका आहेत.
चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात प्रीतम यांचे संगीत आहे आणि 5 वर्षांच्या लुडोनंतर संगीतकार आणि दिग्दर्शक यांच्यातील आणखी एक सहकार्य आहे. मेट्रो… इन डिनो हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीजने अनुराग बसू प्रॉडक्शनच्या सहकार्याने सादर केला आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराग बसू आणि तानी बसू निर्मित हा चित्रपट 4 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
