रणबीर-दीपिकाच्या ब्रेकमागील कारणाचा नीतू कपूर यांच्याकडून खुलासा; म्हणाल्या “त्यांच्या नात्यात..”

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचं ब्रेकअप कशामुळे झालं होतं, असा प्रश्न आजही अनेक चाहत्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर खुद्द रणबीरची आई नीतू कपूर यांनी दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणबीर-दीपिकाच्या ब्रेकमागील कारणाचा नीतू कपूर यांच्याकडून खुलासा; म्हणाल्या त्यांच्या नात्यात..
Neetu Kapoor, Deepika Padukone and Ranbir Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2025 | 1:57 PM

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. या दोघांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप जगजाहीर आहे. रणबीर आणि दीपिका एकमेकांसोबत लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. परंतु त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतर दीपिका नैराश्यात गेल्याचंही म्हटलं जातं. अनेकदा ती स्वत: मानसिक स्वास्थ्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्यांच्या ब्रेकअपमागील कारणांबद्दल विविध चर्चा होतात. रणबीरने दीपिकाची फसवणूक केली असं काही म्हणतात, तर रणबीरची आई नीतू कपूर यांचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता, अशीही चर्चा होती. आता नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या स्वत: रणबीर-दीपिकाच्या ब्रेकअपमागील कारण सांगताना दिसत आहेत.

सिमी गरेवाल यांच्या ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ या चॅट शोमधील ही क्लिप आहे. रणबीर कपूर यामध्ये पाहुणा म्हणून बसलेला दिसतोय. तर त्याला नीतू कपूर यांचा व्हिडीओ दाखवला जातो. या व्हिडीओमध्ये त्या मुलाच्या नात्याबद्दल व्यक्त होतात. “मला वाटत नाही की त्याचे अनेक गर्लफ्रेंड्स आहेत. त्याची फक्त एकच गर्लफ्रेंड होती आणि ती म्हणजे दीपिका. माझ्या मते त्यांच्या नात्यात काहीतरी कमतरता होती. काहीतरी त्यांच्या नात्यात नव्हतं. कदाचित त्याला मोकळेपणे किंवा त्याच्या स्वभावानुसार राहता येत नव्हतं आणि त्याला वेगळं व्हायचं होतं. प्रत्येकाचं रिलेशनशिप असतं आणि ते आपापल्या आयुष्यात पुढे निघून जातात. जर त्यांचं नातं परिपूर्ण किंवा परफेक्ट असतं तर त्यांचा ब्रेकअप झाला नसता. कदाचित रणबीर त्या नात्यात मनमोकळा नव्हता”, असं त्या म्हणाल्या.

रणबीर आणि दीपिका यांचं 2009 मध्ये ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर तो अभिनेत्री कतरिना कैफला डेट करू लागला होता. या दोघांचंही 2016 मध्ये ब्रेकअप झालं. अखेर त्याने आलिया भट्टशी लग्न केलं असून या दोघांना राहा ही मुलगी आहे. तर दुसरीकडे दीपिकाने अभिनेता रणवीर सिंहची लग्न केलं असून त्यांना दुआ नावाची मुलगी आहे.