ही दीपिका आहे की रेखा? अजब लूक पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील तिचा लूक पाहून नेटकरी पेचात पडले आहेत. ही दीपिका आहे की रेखा, असा सवाल नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या ब्रँडला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पादुकोणने रॅम्प वॉक केला. फॅशन शोमधील दीपिकाचा अनोखा लूक पाहून सर्वजण थक्क झाले होते. पांढऱ्या रंगाचे ट्राऊजर्स, शर्ट आणि त्यावर ट्रेंच कोट असा तिचा लूक होता. यावेळी दीपिकाची हेअरस्टाइल आणि एकंदर तिचं व्यक्तीमत्त्व पाहून ती जणू अभिनेत्री रेखा यांच्यासारखीच दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. “ही दीपिका आहे की रेखा”, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. दीपिकाच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
दीपिकाशिवाय अभिनेत्री सोनम कपूर, आलिया भट्ट, अदिती राव हैदरी यांसारख्या अभिनेत्रींनीही रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधलं. सब्यसाची मुखर्जी हे इंडस्ट्रीतील अत्यंत प्रतिष्ठित फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या लग्नातील कपडे डिझाइन केले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या कपड्यांना विशेष पसंती देतात. म्हणूनच त्यांच्या ब्रँडला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्वजण या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाले होते. रेड कार्पेटवर अभिनेत्री आलिया भट्टनेही तिच्या साडीतील लूकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आलियाने काळ्या रंगाची साडी आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.
View this post on Instagram
दीपिकाने गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव ‘दुआ’ असं ठेवलंय. मुलीच्या जन्मानंतर दीपिका सर्वांत आधी गायक दिलजित दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. त्यानंतर आता सब्यसाची यांच्या कार्यक्रमामुळे दीपिकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
मुलीच्या जन्माच्या चार महिन्यांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पापाराझींना तिचा चेहरा दाखवला होता. यासाठी त्यांनी खास एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला फक्त पापाराझी आणि फोटोग्राफर्स उपस्थित होते. यावेळी त्यांनी पापाराझींना तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली.
