Neha Bhasin: बर्थडे पार्टीत नेहा भसीनचा अश्लील डान्स; नेटकऱ्यांनी केली बार डान्सर्सशी तुलना

गायिका नेहा भसीनचा डान्स व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले 'अश्लीलतेची मर्यादा ओलांडली'

Neha Bhasin: बर्थडे पार्टीत नेहा भसीनचा अश्लील डान्स; नेटकऱ्यांनी केली बार डान्सर्सशी तुलना
Neha Bhasin
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 18, 2022 | 2:01 PM

मुंबई: प्रसिद्ध गायिका आणि ‘बिग बॉस 15’ फेम नेहा भसीनने नुकताच तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त तिने मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली होती. यामध्ये रश्मी देसाई, राजीव अदातिया, उमर रियाज, हिमेश रेशमियाँ यांचा समावेश होता. या पार्टीतील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओतील नेहाचा डान्स पाहून नेटकरी तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. तर काहींनी तिच्या कपड्यांवरूनही ट्रोल केलंय.

बर्थडे सेलिब्रेशनमध्ये नेहाने केक कापल्यानंतर टेबलवर चढून डान्स केला. तिच्या याच डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यावरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. इतकंच नव्हे तर काहींनी तिची तुलना बार डान्सर्सशी केली.

‘अश्लीलतेची सुद्धा मर्यादा असते’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘तुला लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने राग व्यक्त केला. ‘या सेलिब्रिटींना नेमकं झालंय तरी काय’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.

नेहा भसीनला 2007 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातील ‘कुछ खास है’ या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय तिने ‘मेरे ब्रदर की दुल्हन’मधील ‘धुनकी’, ‘सुलतान’मधील ‘जग घुमेया’ यांसारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत. नेहाने बिग बॉसच्या पंधराव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी सुद्धा ती तिच्या वागणुकीमुळे चर्चेत आली होती.