ग्लॅमरस नेहा पेंडसेला आवडतं ‘सस्टेनेबल’ राहणीमान! जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत चाहत्यांनाही आवाहन

सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर मर्यादित स्‍वरूपात करणे आणि हरित पद्धतींचा सर्वोत्तम पद्धतीने अवलंब करण्‍यासाठी योग्‍य निवड करणे. यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे 'इकोसिस्टिम रिस्‍टोरेशन'.

ग्लॅमरस नेहा पेंडसेला आवडतं ‘सस्टेनेबल’ राहणीमान! जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत चाहत्यांनाही आवाहन
नेहा पेंडसे
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 5:07 PM

मुंबई : निसर्ग आपल्‍यासाठी घरासारखाच आहे. आपण निसर्गाची काळजी घेतो, तेव्‍हा निसर्ग देखील आपले संरक्षण करतो. पण स्‍वयंपाक, साफसफाई, प्रवास अशा आपल्‍या दैनंदिन कृतींचा पर्यावरणावर (Environment  Day 2021)  अनेक पद्धतीने परिणाम होतो. आपले जीवन काहीसे मंदावलेले असताना निसर्ग बहरले आहे. या काळाने आपल्‍याला महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे, ती म्‍हणजे नैसर्गिक विश्‍वाचे जतन करा. आपण गतकाळात परत जाऊ शकत नाही आणि म्‍हणूनच ‘सस्टेनेबल’ राहणीमान अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे (Neha Pendse share her Sustainable lifestyle story on Environment Day 2021).

सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर मर्यादित स्‍वरूपात करणे आणि हरित पद्धतींचा सर्वोत्तम पद्धतीने अवलंब करण्‍यासाठी योग्‍य निवड करणे. यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे ‘इकोसिस्टिम रिस्‍टोरेशन’. ‘भाबीजी घर पर है’ फेम मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) आणि ‘और भई क्‍या चल रहा है?’फेम आकांशा शर्मा (Akanksha Sharma) यांनी सस्टेनेबल राहणीमान अवलंबण्‍याप्रती त्‍यांच्‍या लहानशा प्रयत्‍नांबाबत महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

भूमातेचे संवर्धन करा!

‘गोरी मेम’ फेम अभिनेत्री नेहा पेंडसे याविषयी सांगताना म्‍हणाली की, ‘सोप्‍या भाषेत सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे आपल्‍या जीवनशैली निवडींचा आसपासच्‍या विश्‍वावर होणारा परिणाम जाणून घेणे आणि सर्वांनी उत्तमपणे व जबाबदारपूर्वक जगण्‍यासाठी मार्ग शोधून काढणे. हरित पद्धतींचा अवलंब हा आपल्‍या भूमातेचे संवर्धन व संरक्षण करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. यासंदर्भात मी प्‍लास्टिकचा वापर कमी केला आहे आणि त्‍याऐवजी माझ्या किराणा माल व इतर आवश्‍यकतांसाठी प्‍लास्टिक-मुक्‍त पर्यायांचा वापर करते. मी सोबत सुती किंवा तागाच्‍या पिशव्‍या घेऊन जाण्‍याची काळजी घेते.’

‘ऊर्जेसंदर्भात मी इन्‍कॅन्‍डेसण्‍ट लायटिंगऐवजी एलईडी लायटिंग किंवा सीएफएल बल्‍ब्सचा वापर करते, कारण हे दीर्घकाळापर्यंत टिकतात आणि ऊर्जेची बचत करतात. याव्‍यतिरिक्‍त मी नैसर्गिक प्रकाशाला देखील प्राधान्‍य देते, ज्‍यामुळे ऊर्जासंवर्धनामध्‍ये मदत होण्‍यासोबत काहीशा अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्‍यामध्‍ये देखील मदत होते. आपल्‍या रोजच्‍या सवयींमधील हे लहानसे बदल आपल्‍याला पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक बनवू शकतात आणि मोठे परिवर्तन घडून येऊ शकते.’(Neha Pendse share her Sustainable lifestyle story on Environment Day 2021)

पर्यावरणाचे ऋण फेडले पाहिजे!

‘और भई क्‍या चल रहा है?’ फेम अभिनेत्री आकांशा शर्मा म्‍हणाली, ‘पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे महत्त्वाचे आहे. या भूमातेच्‍या अधिवासामध्‍ये पर्यावरणाचे प्रदूषणापासून, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या इतर कृतींपासून संरक्षण करणे हे आपले नैतिक कर्तव्‍य असले पाहिजे. आपले पर्यावरण आपल्‍याला शुद्ध हवा, पाणी, अन्‍न अशी अनेक नैसर्गिक संसाधने देते आणि म्हणूनच आपण देखील पर्यावरणाचे संरक्षण करत, त्याचे ऋण फेडले पाहिजेत.’

‘वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण विशेषत: मेट्रो शहरांमध्‍ये मोठी समस्‍या बनली आहे. म्‍हणून मी माझ्या वाहनाचा वापर न करता शक्‍यतो लहान अंतरासाठी पायीच चालत जाते. तसेच मी प्‍लास्टिकचा वापर आणि पाणी व इतर नैसर्गिक संसाधनांचा अपव्‍यय टाळते. आपल्‍या भूमातेची परतफेड आणि भेट म्‍हणून आम्ही दर सहा महिन्‍यांनी एक रोपटे लावण्‍याचे ठरवले आहे. आपण हरित व शुद्ध पर्यावरणासाठी अनेक गोष्‍टी करू शकतो. चला तर मग संघटित होऊन असे सोपे मार्ग शोधून काढूया, जे आपल्‍याला पर्यावरणाप्रती आपले योगदान देण्‍यामध्‍ये मदत करू शकतात.’

(Neha Pendse share her Sustainable lifestyle story on Environment Day 2021)

हेही वाचा :

‘मी 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, पण मला उत्तर हवंय’, जुही चावलाने दिले स्पष्टीकरण

Binge Watch | पुन्हा ताज्या होतील 90च्या दशकाच्या आठवणी, OTTवर पाहू शकता ‘या’ सर्वोत्कृष्ट मालिका!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.