
अभिनेत्री करीना कपूर हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ती नेहमीच चर्चेत राहिली. पण आता तिचे मुलं तैमूर आणि जेह देखील चर्चेचा भाग असतात. बाहेर पडले की दोघेही मीडियाला हात दाखवताना दिसतात. तैमूर आणि जेह हे नेहमीच त्यांचा सांभाळ करणाऱ्या ललिता डिसिल्वा यांच्यासोबत दिसतात. खूप कमी लोकांना माहित आहे की, ललिता या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच देखील दिसल्या होत्या. कारण त्यांनी अंबानींच्या घरी ही मुलांचा सांभाळ करण्याचं काम केलं आहे. ललिता डिसिल्वा यांनी खान कुटुंबासोबतच्या त्यांच्या आठवणी सांगितल्या. महत्त्वाचं म्हणजे करीना कपूर कोणत्या धर्माचं पालन करते हे देखील त्यांनी सांगितले आहे.
हिंदी रश या यूट्यूब चॅनलला ललिता डिसिल्वा यांनी मुलाखत दिली. करीना एक आई म्हणून कशी आहे असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, “करीना आपल्या मुलांवर खूप प्रेम करते. महत्त्वाचे म्हणजे ती खूप शिस्तप्रिय आहे. मला असे वाटते की तिची आई (बबिता) देखील खूप शिस्तप्रिय आहे.”
“मी वैयक्तिकरित्या करिनाचे बालपण पाहिलेले नाही, पण तिने जे सांगितले त्यावरून मला असे कळले की तिची आई देखील खूप शिस्तप्रिय होती. नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची आणि वेळापत्रक बनवून ती पाळायची.”
“करीना कपूर ही तिच्या आईप्रमाणे ख्रिश्चन धर्माचे पालन करते. ती मला म्हणायची की, तुला भजन वाजवायला आवडत असेल तर माझ्या मुलांसाठी (तैमूर आणि जे) भजन वाजव. मी भजन वाजवत असे. करीनाने मला पंजाबी भजन एक ओंकार वाजवायला सांगितलं होतं.
ललिताने अलीकडेच दरमहा अडीच लाख रुपये मिळत असल्याच्या अफवांबद्दल ही खुलासा केला. कर्मचारी खान कुटुंबासारखेच अन्न खातात. “ते खूप साधे लोक आहेत. सकाळची दिनचर्या अशी आहे की स्टाफ, करीना आणि सैफ सगळे सारखेच जेवण करतात. स्टाफला वेगळे जेवण असते असे काही नाही. सारखेच जेवण आणि दर्जेदार जेवण आम्ही सगळ्यांनी खाल्ले आहे. अनेक वेळा एकत्र जेवलो आहेत.”
करीना कपूर खान तिच्या आगामी सिंघम अगेन या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यन आणि विद्या बालनच्या भूल भुलैया 3 सोबत त्याची टक्कर होणार आहे.