AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कपिल शर्माच्या शो’मधून सिद्धू आऊट?

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची बाजू घेणे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे विद्यमान नेते नवजोत सिंह सिद्धू यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या नवजोत सिंह सिद्धू यांची कार्यक्रमातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी चॅनेलने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचंही बाोललं जात आहे. तर त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पुरणसिंह या […]

'कपिल शर्माच्या शो'मधून सिद्धू आऊट?
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची बाजू घेणे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे विद्यमान नेते नवजोत सिंह सिद्धू यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असलेल्या नवजोत सिंह सिद्धू यांची कार्यक्रमातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. सोनी चॅनेलने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचंही बाोललं जात आहे. तर त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पुरणसिंह या कार्यक्रमात दिसण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दोन भागांचं शूटिंग अर्चना यांनी केलं. मात्र, सोनी चॅनेलने अद्याप अर्चना यांना सिद्धूच्या जागी रिप्लेस करण्यात आल्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली. यानंतर संपूर्ण जगातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानविरोधात देशात संतापाची लाट उसळली.

वाचा : “आणखी एका मुलाला सैन्यात पाठवेन, पण पाकला धडा शिकवा”

मात्र, नवजोत सिंह सिद्धू यांना पाकिस्तानचा पुळका आला.

“काही लोकांमुळे संपूर्ण देशाला गुन्हेगार समजणे चुकीचे आहे. हा एक भ्याड हल्ला होता, मी याचा विरोध करतो. हिंसा ही निंदनीय आहे. ज्यांची चुक आहे त्यांना शिक्षा व्हायलाच हवी”, असे म्हणत सिद्धू हे पाकिस्तानची बाजू घेताना दिसले.

सिद्धू यांच्या या वक्तव्यानंतर लोकांमधील आक्रोश वाढला. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आणि पाकिस्तानची बाजू घेण्यावर टीका केली. त्यांना तात्काळ ‘द कपिल शर्मा शो’मधून काढण्यात यावे ही मागणी उठू लागली. इतकेच नाही तर, ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्यात यावा अशीही मागणी होऊ लागली. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांवरील दबाव वाढला आहे, त्यामुळे सिद्धू यांना कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो.

पुलवामा हल्ला :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. आदिल अहमद डार नावाच्या दहशतवाद्याने सुसाईट बॉम्बर बनून हा आत्मघाती हल्ला केला.

संबंधित बातम्या :

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?

Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र

गंभीरचा संताप, सेहवागची हळहळ, सलमान,आमीर, शाहरुखची श्रद्धांजली

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या