AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात बाळ जन्माला येताच हे गाणं म्हटलं जातं, 65 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय

मुलांच्या जन्मानंतर प्रत्येक घरात वाजतं 65 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे घरात बाळाच्या जन्माचा आनंद आणि मातृत्वाची भावना व्यक्त करणारं ठरलं. आजही अनेक महिला ऐकतात.

घरात बाळ जन्माला येताच हे गाणं म्हटलं जातं, 65 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 12, 2026 | 1:39 PM
Share

घरात बाळाचा जन्म होणं म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. नन्ह्या पाहुण्याच्या आगमनानंतर घरात शुभेच्छा, बधाई गीत आणि संगीताचा माहोल पाहायला मिळतो. बॉलिवूडमध्येही बाळाच्या जन्माचा आनंद आणि मातृत्वाची भावना व्यक्त करणारी अनेक सुंदर गाणी तयार झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1961 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यार की प्यास’ या चित्रपटातील ‘मेरे अंगना में उजियाला, मेरी गोदी में गोपाला’ हे भावस्पर्शी गीत.

या गाण्यात आईच्या कुशीत आलेल्या बाळाकडे कृष्णाचं रूप म्हणून पाहिलं आहे. बाळाच्या जन्मामुळे घरात उजेड आणि आनंद पसरल्याची भावना या गाण्याच्या शब्दांतून व्यक्त होते. ‘मेरी गोदी में गोपाला’ ही ओळ आईच्या ममतेसोबतच बाळाबद्दलचं तिचं अपार प्रेम आणि आनंद अधोरेखित करते. तसेच बाळाला वाईट नजरेपासून वाचवण्याची भावनाही गाण्यातून व्यक्त होते.

लता मंगेशकर आणि गीता दत्त यांच्या आवाजाची जादू

या गाण्याला भारत व्यास यांनी सुंदर शब्द दिले होते तर ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांनी त्याला संगीतबद्ध केलं होतं. लता मंगेशकर आणि गीता दत्त यांच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं आणखी खास बनलं. गीताचे शब्द, भारतीय संस्कारांची झलक आणि कृष्णभक्तीची भावना यांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो.

‘प्यार की प्यास’ चित्रपटाची खासियत

‘मेरे अंगना में उजियाला’ हे गीत ‘प्यार की प्यास’ या 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा भाग होतं. महेश कौल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. श्रीकांत, निशी, मनमोहन कृष्ण, डेव्हिड, मनोरमा आणि हनी ईरानी यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.

चित्रपटाची कथा गीता नावाच्या एका अनाथ मुलीभोवती फिरते. एका कुटुंबाकडून तिला दत्तक घेतलं जातं; मात्र पुढे त्या कुटुंबात बाळाचा जन्म झाल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल घडतो. या कथानकाला त्या काळात चांगली दाद मिळाली होती. 1961 मध्ये हिंदीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी चित्रपटाला Certificate of Merit देखील मिळालं होतं.

आईच्या कुशीत आलेल्या बाळाला कृष्णाचं रूप मानून त्याच्या जन्माचा आनंद साजरा करणारं ‘मेरे अंगना में उजियाला’ हे गाणं आजही मातृत्व, माया आणि बाळाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणारं एक सुंदर आणि लक्षात राहणारं गाणं म्हणून ओळखलं जातं.

Follow Us
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त