
स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत लवकरच नवीन धमाका पाहायला मिळणार आहे.

जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे.

ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे.

गौरी साधीभोळी असली तर ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे.

आता ही गौरीच आहे की दुसरी कुणी हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेलच. मात्र ती गौरीच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला पळता भुई थोडं करणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.