
न्यूज 9 ग्लोबल समिट 2025 मध्ये जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. यंदा यूएईमध्ये ही समिट होत आहे. त्यात चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील अनेक मोठे स्टार्स सहभागी झाले आहेत. बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये दीर्घकाळापासून काम करणारा सुनील शेट्टी सुद्धा या ग्रँड समिटमध्ये सहभागी झाला होता. या समिटच्या ‘द सिनेमॅटिक इन्वेस्टर’ सेगमेंटमध्ये आपल्या जीवनातील अनेक पैलूंबद्दल तो बोलला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात एक Action हिरो म्हणून केली होती. सुनील शेट्टी आपल्या करिअरमध्ये Action हिरो म्हणून लोकप्रिय होता. वयाची साठी ओलांडल्यानंतर Action चित्रपटात काम करण्याबद्दल तो बोलला.
अभिनेता सुनील शेट्टी आता 64 वर्षांचा आहे. त्याने नेहमी आपली फिटनेस आणि आरोग्यावर लक्ष दिलं आहे. सुनील त्याच्या हेल्थच्या बाबतीत कधीही तडजोड करत नाही. म्हणूनच त्याला Action हिरोचा टॅग मिळाला. म्हणून त्याला पाहिल्यानंतर सुनील शेट्टी आजही Action सीन्स करु शकतो असं प्रेक्षकांना वाटतं. त्याला बॉडी डबलची गरज पडत नाही. सुनील शेट्टी म्हणाला की, “एक गोष्ट खरी आहे, आता मी 64 वर्षांचा झालोय, Action सीन्स करण्यात मलाही अडचणी येतात”
मला हिंदी सिनेमा दुसऱ्या सिनेमांचा बाप वाटतो
बॉलिवूडमध्ये सध्या जी स्थिती आहे, ती तुम्हाला पुढे जाताना दिसतेय की, घसरण होताना पाहता? त्यावर सुनील शेट्टी बोलला की, “फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडतायत. आपण कुठे आहोत, हे मी सांगू शकत नाही. कुठल्याही इंडस्ट्रीचा चित्रपट चालला, तर त्यांना असं वाटतं की, ते बॉलिवूडपेक्षा मोठे झालेत. पण प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, मला हिंदी सिनेमा दुसऱ्या सिनेमांचा बाप वाटतो”