बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र सध्या निक आणि प्रियांकाची आई मधू चोप्रा चर्चेत आले आहेत.
निक आणि प्रियांकाने आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. या सेलिब्रेशनदरम्यान निकची फॅमिली बाँडींग पहायला मिळाली. लॉस एंजेलिसच्या एका हॉटेलमध्ये निक आणि प्रियांका कुटुंबीयांसोबत डिनरला गेले होते.
डिनर पार्टीनंतर निक आणि मधू चोप्रा यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सासू आणि जावई यांच्यातील बाँडींग स्पष्ट पहायला मिळतेय. जावई असावा तर असा.. असे कमेंट्स नेटकरी या फोटोंवर करत आहेत.
या फोटोंमध्ये निकने मधू चोप्रा यांचा हात धरला आहे. सासूचा हात धरून निक रेस्टाँरंटच्या बाहेर कुठेतरी जाताना पहायला मिळत आहे. तर प्रियांका या दोघांच्या पुढे चालत आहे.
निक आणि मधू यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहींनी निकचा उल्लेख ‘नॅशनल जीजू’ असा केला आहे.