Bigg Boss 14 | निक्की तांबोळीचे विकास गुप्तावर गंभीर आरोप!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे. आता निक्की तांबोळीने विकास गुप्तावर गंभीर आरोप केले आहेत.

Bigg Boss 14 | निक्की तांबोळीचे विकास गुप्तावर गंभीर आरोप!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चे पर्व सध्या जोशात आले आहे. घरामध्ये दररोज नवीन हंगामा बघायला मिळत आहे. आता निक्की तांबोळीने विकास गुप्तावर गंभीर आरोप केले आहेत. किचनमध्ये एक प्लेटवरून हा वाद निर्माण झाला आहे. किचनमध्ये निक्कीने प्लेट न धुताच ठेवली होती, रूबीमा म्हणते की, अशाप्रकारे येथे प्लेट कोणी ठेवली आहे यावर विकास निक्कीचे नाव घेतो आणि म्हणतो की, चल उचल प्लेट यावर निक्की म्हणते की, तु माझा मित्र वगैरे नाहीस तु मला अशा शब्दात कसा बोसू शकतो यावरून निक्की आणि विकासमध्ये जोरदार भांडणे होताना दिसतात. (Nikki Tamboli made serious allegations against Vikas Gupta)

त्यावेळी निक्की विकासला म्हणते तु बिग बॉसच्या घरात चुम्माचाटी करतो हे मला माहिती आहे निक्कीच्या या वाक्यानंतर घरात जोरदार हंगामा बघायला मिळतो. काही दिवसांपूर्वी निक्की आणि राहुल वैद्य यांच्यातही भांडण झाली होती. त्यावेळी निक्कीने दिशा परमारचे नाव घेतले होते. हे ऐकल्यानंतर राहुल वैद्य निक्कीवर चिडला होता आणि आपल्या भांडणामध्ये तिचे नाव घ्यायचे नाही असे तो निक्कीला सांगतो मात्र, निक्की राहुलचे आणि घरातील इतर सदस्यांचे काही ऐकत नाही.

रुबीना दिलैक आणि राखी सावंतमध्ये देखील भांडणे होतात दुपारचे जेवण बनवण्याची ड्युटी रुबीनाची होती. मात्र, रुबीना जेवण बनवायच्या अगोदरच राखी जेवण बनवत होती. हे पाहुण रुबीनाला राग येतो आणि रुबीना राखीला म्हणते की, जेवण तयार करण्याची ड्युटी माझी असताना राखी तु का बनवत आहेस त्यावर राखी म्हणते की, सर्वांना भूक लागली होती म्हणून मी बनवत होते. त्यावर रुबीना राखीवर चिडते आणि म्हणते की, तुला सर्वांना असे दाखवायचे आहे की, तु खूप जास्त काम करते आणि मी काहीच काम करत नाही. याच विषयावर राखी-रुबीनामध्ये जोरदार हंगामा बघायला मिळाला.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी आणि रुबीना दिलैकची हात मिळवणी, अलीचा पारा चढला…

Bigg Boss 14 | घरच्यांनी आणला राखीच्या नाकात दम… राखी रडून रडून बेजार!

(Nikki Tamboli made serious allegations against Vikas Gupta)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI