Bigg Boss 14 :विकास गुप्ताची तब्येत पुन्हा खालावली, घरातून गायब!

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) सध्या खुपच चर्चेत आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:06 AM, 12 Jan 2021
bigg boss 14

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) सध्या खुपच चर्चेत आले आहे. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडण, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रविवारच्या भागात जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) बेघर झाली होती. तर आता बिग बॉसच्या घरातून विकास गुप्ता (Vikas Gupta) गायब झाला आहे. विकास गुप्ता बिग बॉसच्या घरातील लाइव फीडमध्ये दिसत नाहीये. असे सांगितले जात आहे की, विकासची अचानक तब्येत खराब झाली आहे ज्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.(Vikas Gupta out of Bigg Boss’s house for medical emergency)

मात्र, आता परत विकास बिग बॉसच्या घरात येणार की, तो खेळातून बाहेर जाणार हे बघण्यासारखे ठरणार आहे. बिग बॉसच्या या अगोदरील हंगामात देखील घरातील सदस्यांची तब्येत बिघडल्यानंतर घरात डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी यायचे. परंतू काही गंभीर कारण असल्यावर घराच्या बाहेर नेण्यात येते. विकासला देखील उपचारासाठी बाहेर नेण्यात आले आहे असे बातमी आहे. उपचार झाल्यानंतर विकासला परत एकदा 14 दिवस क्वारंटीन व्हावे लागणार आहे. अशा परिस्थितीत निर्माते त्याला परत एकदा घरात आणतात की, गुडबाय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

अली गोनी आणि निक्की तांबोळी यांना बिग बॉस कडून कठोर शिक्षा मिळणार आहे. कारण त्यांनी घराच्या महत्त्वपूर्ण नॉमिनेशन प्रक्रियेचा मज्जाक उडवला होता. निक्की आणि अली ही मज्जाक घरातील सर्वच सदस्यांना भारी पडणार. बिग बॉसने घरातील इतर सदस्यांना सांगितले की, त्यांनी केलेल्या चुकीचे सजा तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. त्यानंतर घरातील इतर सदस्य निक्की आणि अलीला भांडताना दिसत होती.

संबंधित बातम्या : 

जास्मीनपासून वेगळं होताना अली गोनीला हुंदका, चाहते म्हणाले, ओव्हरअ‌ॅक्टिंगचे 50 रुपये कापा

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग ट्रेंड!

(Vikas Gupta out of Bigg Boss’s house for medical emergency)